Close Visit Mhshetkari

Provident Fund : PPF, EPF, NPS आणि GPF यात काय फरक आहे ? जाणून घेऊयात भविष्य निर्वाह निधी योजनांची सविस्तर माहिती …

Provident Fund : नमस्कार मित्रांनो, आज आपण भविष्य निर्वाह निधी संदर्भातील वेगवेगळ्या योजनांची माहिती बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला तीन प्रकारांची वर्गवारी आढळून EPFO कडून कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासंदर्भात या सर्व योजना सरकारकडून चालवण्यात येतात.

Types of Provident Fund

भविष्य निर्वाह निधी संघटने कडून चालवण्यात येणाऱ्या या योजनांमध्ये खाजगी कर्मचाऱ्यांसोबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात योजनांचा समावेश आहे.

पेन्शन योजनेत कर्मचारी किंवा नियुक्त बरोबरच सरकार सुद्धा रक्कम जमा करते.विशेष म्हणजे या जमा रकमेवर सरकारकडून विशिष्ट व्यास सुद्धा मिळत असते.आपल्या पीएफ अकाउंट मध्ये जमा असलेली रक्कम आपण काढू शकतो त्यामध्ये वेगवेगळ्या कारणांचा समावेश केलेला आहे जसे की,आरोग्य शिक्षण किंवा घरबांधणी मुलांच्या लग्नासाठी याचा वापर करता येऊ शकतो.

आज आपण जाणून घेणार आहोत PPF, EPF,NPS आणि GPF या सर्वात सामान्य PF योजनांबद्दल सविस्तर माहिती

Employees Provident Fund (EPF)

खाजगी क्षेत्रातील 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थेत सदरील ईपीएफ योजना लागू करण्यात येते. सदरील योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO चालवते.EPF योजनेत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही पगाराच्या एक निश्चित टक्केवारी जमा करण्यात येते.सध्या, कर्मचारी व सरकार दोन्ही पगाराच्या 12 % रक्कम जमा करतात.

व्याज दर :- EPF वरील व्याज दर दरवर्षी सरकार निर्धारित करते. सध्याचा दर 8.50% आहे (2020-21 आर्थिक वर्षासाठी).

कर लाभ :- EPF अंतर्गत केलेल्या योगदानावर आणि मिळालेल्या व्याजावर कर सूट मिळते (आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80C अंतर्गत)

हे पण वाचा ~  Retirement Benefits : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर कोणते लाभ मिळतात..? किती रक्कम मिळते; फक्त 2 मिनिटात करा चेक..

Public Provident Fund (PPF)

मित्रांनो PPF खाते कोणालाही उघडता येते.भारत सरकार PPF योजना चालवते.PPF मध्ये आपण किमान ₹500 आणि जास्तीत जास्त ₹1.5 लाख दरवर्षी जमा करू शकता. 

व्याज दर :- PPF वरील व्याज दर तिमाही सरकार निर्धारित करते.सध्याचा दर 7.1% आहे.

कर लाभ :- PPF अंतर्गत केलेल्या योगदानावर आणि मिळालेल्या व्याजावर कर सूट मिळते.आयकर अधिनियम 1961 च्या कलम 80C अंतर्गत

General Provident Fund (GPF)

सरकारी कर्मचारी GPF साठी पात्र असतात.केंद्र सरकारच्या कामगार कार्मिक आणि पेन्शन मंत्रालय मार्फत पेन्शन GPF योजना चालवल्या जातात.GPF मध्ये कर्मचारी स्वेच्छेने वेतनाच्या किमान 6 % पर्यंत रक्कम जमा करू शकतात.सरकार कोणतेही योगदान देत नाही.

व्याज दर : – GPF वरील व्याज दर सरकार निर्धारित करते. सध्याचा दर 7.1% आहे (ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाही).

कर लाभ :- GPF अंतर्गत केलेल्या योगदानावर कर सूट मिळते (आयकर अधिनियम 1961)

National Pension Scheme (NPS)

सन 2005 नंतर सरकारी सेवेत जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार व राज्य कर्मचाऱ्याना NPS म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली आहे. Nps मध्ये कर्मचारी पगाराच्या 10 % पर्यंत योगदान देऊ शकतात.

सरकार कर्मचाऱ्यांच्या योगदानात 14 % पर्यंत सहयोगदान देते. कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर nps खात्यात जमा रकमेच्या 60 % एकरकमी मिळते.उर्वरित 40 % रक्कम पेन्शन स्वरूपात मिळते.NPS मधून मिळणाऱ्या पेन्शनावर कोणताही कर आकारला जात नाही.

Leave a Comment