Close Visit Mhshetkari

Government Employee : आणखी एक गुड न्यूज! आता या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये होणार वाढ; प्रशासकीय मंजुरी मिळाली …

Government Employee : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, नुकतीच केंद्र सरकारने एम पी एस धारक कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्सिल स्कीम लागू केली होती त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा ही योजना स्वीकारण्याचे जाहीर केले आहे.

मागच्याच महिन्यात महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळालेला असताना आता मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे.

Government Employee Allowance Hike

मित्रांनो ब्रो मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील सुधारित वेतनश्रेणी दिली असली तरी विविध भक्तांमध्ये आतापर्यंत वाढ करण्यात आलेली नव्हती.

आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्याना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी दिली आहे ल,अशी माहिती मनपाने प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

हे पण वाचा ~  Employees arrears : मोठी बातमी.. या कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत हप्त्यासह वेतन अनुदान!शासन निर्णय निर्गमित..

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर, सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती.

BMC Employee Salary Hike

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना खालील बातम्या सुधारणा करण्याचे सदरील परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.वाहन भत्ता, रजा प्रवास सहाय्य, तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते, मुलांच्या शिक्षणाकरीता भत्ता, दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. 

सदरील भत्ते वाढसंदर्भातील इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन सविस्तर परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात येणार आहे.

Leave a Comment