Close Visit Mhshetkari

Election Duty : लोकसभा निवडणूक ड्यूटी लागली ? पहा मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी जबाबदारी,नियम व पद्धती …

Election Duty : लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम २६ नुसार सदर कामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम २८ क नुसार आपण निवडणूक आयोगाच्या निवडणूक कामासाठी प्रतिनियुक्तीवर असतात.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपणाला देण्यात आलेली जबाबदारी, संबंधीत कायदे, नियम व पद्धती याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

मतदान केंद्राध्यक्ष कामे | Polling Presiding Officer

मतदान दिवसाच्या अगोदरच्या दिवशी

मतदान केंद्र नियुक्ती आदेश प्राप्त करून घ्या.सर्व पथकासह साहित्य वितरण टेबलवरून साहित्य ताब्यात घ्या.आदेशात नमूद क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

नियुक्त केलेल्या मतदान केंद्राचेच साहित्य मिळाल्याची खात्री करा.त्यासाठी BU, CU व VVPAT वरील अनुक्रमांक व ऐड्रेस स्टॅग तपासणी करून घ्या.

पोल युनिटचे कॅन्डीडेट सेट विभाग सेट् विभाग व्यव व्यवस्थित मोहोरबंद पेरबंद केल्याची खात्री कंट्रोल यूनिटचे करा.

बॅलेट युनिट यथोचितरित्या मोहोरबंद केले आहे.मतपत्रिका योग्यरीत्या लावल्याची खात्री करा.

बॅलेट युनिट चे थम्ब व्हील बटण योग्यस्थितित असल्याची खात्री करा.जोडपत्र 3 नुसार सर्व साहित्याची तपासणी करून घ्या.

चिन्हांकित मतदार यादीच्या प्रती, प्रमाणपत्र, मतदार संख्येसह बरोबर असल्याची खात्री करा. निवडणूक लढवणाऱ्या मतदारांची यादी, ASD, CSV यादी मिळाल्याची खात्री करा.

बाणफुलीचे रबरी शिक्के, धातूची मोहोर, शाईची बाटली तपासणी करून घ्या.

मतदान केंद्रावर जाण्याचा,येण्याचा मार्ग व व वाहतुकीचे साधन माहिती करून घ्या. व नियुक्त केलेल्या वाहनातूनच क्षेत्रिय अधिकारी परवानगी घेऊन मतदान साहित्यासह प्रवास करावा.

मतदान दिवसाच्या अगोदरच्या दिवशी

मतदान केंद्रावर पोहचल्यावर सुखरूप पोहचले बाबत क्षेत्रिय अधिकारी यांना कळवावे. मतदान केंद्रावर मतदारांना थांबण्यासाठी पुरेशी जागा आहे. केंद्रामध्ये जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र मार्ग असल्याची खात्री करून घ्या.

मतदान केंद्राची सुच सुचना, भित्तीपत्रके, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राचे बाहेर ठळकपणे लावा.

मतदान केंद्रामध्ये तुमची, प्रतिनिधी व यंत्राची जागा आदर्श मतदान केंद्राप्रमाणे निश्चित ठरवून घ्या. मतदान केंद्रात राजकीय पक्षांचे नेत्यांचे फोटो, निवडणूक चिन्ह विषयक बाबी काढुन/झाकून टाका.

मतदान केंद्रावरील सर्व साहित्याची काळजीपूर्वक जपवणूक करावी.

मतदान केंद्राचे क्षेत्र व मतदार संबंधीचा तपशिल दर्शवणारी सुचना ठळकपणे लावावी.

100 मीटर व 200 मीटर खुणा पांढऱ्या चुन्याने मारून घ्या.

पथकातील सर्व कर्मचारी यांनी मतदान केंद्रावरच मुक्कामी थांबणेबाबत कार्यवाही करा.

मतदान साहित्य आपसात वितरीत करू मध्यावर

मतदान प्रतिनिधी नियुक्ती पत्र तपासुन पहावे.त्यांना गोपनियतेच्या तरतुदी समजावून सांगा.

तुमच्या पथकातील मतदान अधिकारी अनुपस्थित असल्यास क्षेत्रीय अधिकारी यांना कळविणे.

मतदान पुर्ण झाल्यानंतर

मतदानाची अंतिम आकडेवारी तसेच स्त्री पुरुष मतदान आकडेवारी तपासुन घ्या.मतदान यंत्र व VVPAT निर्देशानुसार मोहोरबंद करा.

मतदान छायाचित्र ओळखपत्र शिवाय आणि पर्यायी कागदपत्रासह मतदान केलेल्या व ब्रेल्लिपीतील मतपत्रिका वापरून मतदान केलेल्या, ASD यादीतून मतदान करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या मतदारांसह मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या किती ते पहा. नोंदविलेल्या मतांचा हिशोब (17 सी) तयार करून त्याच्या प्रती मतदान प्रतिनिधी यांना देऊन त्याबाबत प्रतिज्ञापत्र वर पोहोच घ्या.

सर्व निवडणूक विषयक कागदपत्रे संविधानिक, असंविधानिक तयार करून लिफाफे मोहोरबंद करा. सर्व साहित्य बरोबर घेतल्याची खात्री करून संकलन केंद्राकडे नियुक्त वाहतूक आराखडा नुसार निघावे.

टेबलनिहाय ठवून दिलेले साहित्य जमा करून त्याची पोहोच घ्यावी. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून कार्यमुक्ती आदेश घेऊनच संकलन केंद्र सोडावे.

पहिला मतदान अधिकारी | Polling Officer 1

मतदाराची फोटो ओळखपत्रावरून किंवा ओळखिच्या इतर पुराव्यावरून ओळख पटल्यानंतर अशा मतदाराचे चिन्हांकित मतदार यादीतील नाव लाल शाईने तिरपी रेषेत काट करेल.

पुरुष व स्त्री मतदारांची सुलभ पडताळणी व गणना करण्यासाठी स्त्री मतदाराच्या अनुक्रमांकाल अनुक्रमांकाला गोल करण्यात येईल. आणि तृतीय पंथी मतदारांच्या मत अनुक्रमांक जवळ एक चांदणी (STAR) खुण करण्यात येईल.

फक्त व्होट सुचना स्लिप (Voter Information Slip) च्या आधारे मतदारास मतदान करता येणार नाही.VIS घेऊन येणाऱ्या मतदारास ओळखपत्र किंवा इतर ओळखीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा ~  Election Duty : निवडणूक कर्तव्यावर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांना मिळणार " एवढे" सानुग्रह अनुदान !

मतदान केंद्रावर पडदानशीन (बुरखाधारी) महिला मतदार पुरेसे असतील तर त्या महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी महिला मतदान अधिकारी यांची नेमणुक केली जाईल.

फोटो ओळखपत्र (EPIC) नसलेल्या मतदाराची ओळख पटवण्यासाठी इतर पुरावे.

1) आधार कार्ड

2) मनरेगा जॉबकार्ड

3) बँक/पोस्ट ऑफिस ने दिलेले फोटोसहित पासबुक

4) कामगार मंत्रालय कडून देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

5) ड्रायव्हिंग लायसन्स

6) पॅनकार्ड

7) NPR अंतर्गत RGI ने दिलेले स्मार्ट कार्ड

8) भारतीय पारपत्र (पास्पोर्ट) 9) निवृत्त कर्मचाऱ्याचे फोटो असलेले पेन्शनची कागदपत्रे

10) शासकीय/निमशासकीय/सार्वजनिक उपक्रम/कंपनी कामगार इ.ओळखपत्र 

11) खासदार/विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले कार्यालयीन ओळखपत्र

12) सामाजिक न्याय विभागाकडून वितरीत Unique Disability ID (UDID) कार्ड

दुसरा मतदान अधिकारी | Polling Officer 2

दुसरा मतदान अधिकारी कडे पक्की शाई, मतदार नोंदवही (17अ), मतदार चिठ्ठी असेल. मतदान करून देण्यासाठी पक्क्या शाईची खुण करणे तसेच मतदार नोंदवही मध्ये मतदाराची नोंद करून सही अंगठा घेणे व मतदारास मतदार चिट्ठी देणे हे कर्तव्य.

पक्क्या शाईची खुण करणे – मतदान अधिकारी 2 मतदारांच्या डाव्या हाताची तर्जनी पाहील आणि त्यावर शाईची निशाणी नाही ना याची खातरजमा करील आणि नंतर त्यावर शाईचे चिन्ह करील. हे चिन्ह अशा रितीने करण्यात येईल की शाई नखाच्या मुळात आणि नखावरील कातडीवर पसरेल आणि त्यामुळे तर्जनीवर शाईची स्पष्ट खुण राहील. 

मतदाराने डाव्या हाताची तर्जनी तपासून घेण्यास किंवा खुण करून घेण्यास नकार दिला किंवा अगोदरच खुण असेल तर त्याला मतदान करण्यास परवानगी देऊ नये.

मतदाराच्या बोटावर शाई लावण्याची पद्धत

1. डाव्या हाताच्या तर्जनीवर

2. डाव्या हाताची तर्जनी नसल्यास बाजूच्या इतर बोटावर

3. उपरोक्त दोन्ही नसल्यास उजव्या हाताच्या तर्जनीवर 

4. उपरोक्त तीनही नसल्यास उजव्या हाताच्या उपलब्ध

बोटावर

5. दोन्ही हात नसल्यास डाव्या किंवा उजव्या हाताच्या उपलब्ध भागाच्या टोकावर

दुसरा मतदान अधिकारी मतदार नोंदवही नमुना 17 अ मधिल नोंदी

1) मतदारांची नोंदवही (नमुना ना 17 17 अ) मध्ये प्रथम मतदार स्वाक्षरी करण्यापुर्वी मतदान अधिकारी, मतदान केंद्राध्यक्षसह नोंदवही तपासुन घेईल. आणि नमुना 17 अ मध्ये “नियंत्रण युनिट तपासणी केली आहे. व एकूण शुन्य असल्याचे आढळले आहे” अशी शाईने नोंद करेल. 

2) पहिल्या रकान्यात अनुक्रमांक 1 ने सुरवात करून लागोपाठ क्रमाने अनुक्रमांक लिहावे.

3) दुसऱ्या रकान्यात मतदाराचा मतदान यादीतील अनुक्रमांक नमुद करावयाचा आहे. 

4) तिसऱ्या रकान्यात मतदाराने EPIC द्वारे ओळख पटविली असेल तर त्याबाबतीत EP, मतदान छायाचित्र असेल तर क्रमांक लिहण्याची गरज नाही. इतर पुराव्याच्या बाबतीत दाखविलेल्या पुराव्याच्या क्रमांकाचे शेवटचे चार अंक नमूद करावेत. तसेच पुराव्याचा प्रकार नमुद करावा.

5) चौथ्या रकान्यात स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा. 

6) पाचव्या रकान्यात आवश्यकतेनुसार मतदानास नकार, गोपनीयता भंग,EDC मतदार, Test Vote अशा नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यात याव्यात.

7) मतदान प्रकिया संपल्यानंतर शेवटचे मतदाराचे नोंदीखाली लाल शाईने आडवी रेघ ओढून त्याखाली “नमुना 17 अ मधिल शेवटच्या नोंदीचा तपशील लिहिल.

तिसरा मतदान अधिकारी | Polling Officer 3

कंट्रोल युनिट मतदान अधिकारी 03 च्या ताब्यात राहील.

मतदाराकडून मतदार चिठ्ठी (Voter slip) जमा करुन घेईल. व मतदाराच्या बोटाला शाईची खूण केल्याची खातरजमा करील. कंट्रोल युनिट (CU) मधुन BALLOT बटण दाबुन मतदाराला मतदान करण्यासाठी मतदान कक्षाकडे जाण्याची परवानगी देतील.

बॅलेट बटण दाबल्यानंतर CU वरील Busy Lamp लागल्याची व मतदाराने मत नोंदविल्यानंतर बीप आवाज आल्याची खात्री करतील.

दर दोन तासांनी व अंतिम नोंदविलेल्या मतांची आकडेवारी जमा झालेल्या मतदार चिठ्ठी व CU वरील Total बटण दाबुन केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांना पुरवतील.

मतदान संपल्यानंतर तिसऱ्या मतदान अधिकारी कडे जमा झालेल्या चिठ्ठया पुरविण्यात आलेल्या लिफाफ्यात मोहोरबंद करून साहित्यात संकलन केंद्रावर जमा केल्या जातील

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment