Close Visit Mhshetkari

Vehicle agrim : मोठी बातमी… राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार वाहन खरेदी अग्रीम! शासन निर्णय निर्गमित

Vehicle agrim :- शासन अधिसूचना दि. ३० जानेवारी, २०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी दि.१.१.२०१६ पासून सुधारीत करण्यात आल्या आहेत.

वित्त विभाग, शासन निर्णय दि.२०.८.२०१४ अन्वये शासकीय कर्मचान्यांना मोटार सायकल, स्कूटर,मोपेड, सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदी करण्यासाठी अग्रिम मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.

वाहन खरेदी अग्रिम मिळणार !

नवीन मोटार सायकल / स्कूटर / मोपेड / सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तीन चाकी स्वयंचलित सायकल किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम १३६. १३७ व १३९ च्या अधीन आणि तसेच खाली नमूद

केलेल्या अटींच्या अधीन सुधारित वेतन मर्यादेनुसार पुढील प्रमाणे सुधारीत अग्रिम अनुज्ञेय राहील.अग्रिमासाठी अर्ज करणाऱ्या कर्मचान्याची शासनाच्या सेवेतील नियुक्ती संबंधित पदाच्या सेवाभरती नियमांनुसार करण्यात आलेली असली पाहिजे आणि अशाप्रकारे करण्यात आलेल्या नियुक्तीनंतर कमीत कमी ३ वर्षांची सलग सेवा झाली असली पाहिजे.

अस्थिव्यंग दिव्यांग कर्मचाऱ्यास Scooter with adaption हे उपकरण पुरविण्याबाबत शासन निर्णयानुसार या उपकरणासाठी रु.१,००,०००/- मंजूर करण्यात येतात.वाहन अग्रिम म्हणून मंजूर करण्याकरिता, नियुक्तीनंतर कमीत कमी ३ वर्षांची सलग सेवा झालेली असली पाहिजे ही अट अस्थिव्यंग दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत शिथील करण्यात येत आहे.

वाहन खरेदी अग्रिम मंजूरीच्या अटी

मोटार सायकल/स्कूटर / मोपेड वाहन चालविण्यासाठी सक्षम प्राधिकान्यांकडून, कुटुंबातील एका व्यक्तिला मिळालेल्या कायम अनुज्ञप्तीची (Permanent Licence) छायाप्रत सादर करावी लागेल.

अग्रिम मंजूरीपूर्वी अग्रिमासाठी अर्ज करणाऱ्या अधिकाऱ्याची / कर्मचान्याची सेवानिवृत्तीपूर्वी संपूर्ण अग्रिम रक्कम परतफेड करण्याची क्षमता असल्याची, अग्रिम मंजूर करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याची खात्री असावी.

अर्जदाराने आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर सक्षम प्राधिकारी, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ नुसार प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकाराप्रमाणे वाहन अग्रिम मंजूर करू शकतील.

वाहन अग्रिम मंजूरीच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत अग्रिम धारकाने वाहन खरेदी करावी. तसेच खरेदी केलेल्या वाहनाच्या उत्पादनाचे वर्ष, खरेदीची तारीख व नोंदणीचे कागदपत्रे शासनास सादर करावीत. तसे न केल्यास अग्रिम धारकाकडून अग्रिमाची संपूर्ण रक्कम दंडनीय व्याजासह एक रकमी वसूल करण्यात यावी.

हे पण वाचा ~  Old pension : मोठी बातमी.. 'या' सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुनी पेन्शन! शासन निर्णय निर्गमित दि.25/7/2023

वाहन अग्रिमाची व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यंत वाहन शासनाकडे गहाण राहील.त्यासाठी सबंधित कर्मचाऱ्यास विहित नमुन्यात व कार्यपध्दतीप्रमाणे गहाणखत भरून देणे आवश्यक राहील. तसे न केल्यास अग्रिम धारकाकडून अग्रिमाची संपूर्ण रक्कम दंडनीय व्याजासह एक रकमी वसूल करण्यात येईल.

अग्रिमाची रक्कम ज्या महिन्यात वितरीत केली असेल त्याच्या पुढील महिन्यापासून अग्रिमाच्या वसूलीस सुरुवात करण्यात यावी.

वाहन अग्रिम रकमेच्या नियमित वसुलीसाठी तसेच मंजूर अग्रिम रकमेपेक्षा जादा वसुली होत असल्यास त्यास अर्जदार स्वत: ही जबाबदार राहील.

अग्रिमधारक अनधिकृत रजेवर राहिल्यास अथवा इतर अन्य कोणत्याही कारणास्तव त्याच्या कर्तव्यापासून दूर राहिला तरीही वाहन अग्रिम तसेच शासनाकडील इतर अन्य अग्रिमांची नियमित परतफेड करण्यास संबंधित अग्रिमधारक स्वत: जबाबदार राहील.

जुनी मोटार सायकल/स्कूटर/मोपेड/ सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचान्यांसाठी जुनी तीन चाकी सायकल खरेदीकरीता अग्रिम मंजूर करण्यात येणार नाही.

सायकल / दुचाकी / तीन चाकीसाठी संपूर्ण सेवा कालावधीत एकदाच अग्रिम अनुज्ञेय राहील.तथापि, दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या तीन चाकी सायकल खरेदी करीता ही अट शिथिल करण्यात येत आहे.

दि. १ मे, २००५ रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या अर्जदारास (दुसन्या वेळेस जुळया अपत्याचा अपवाद वगळता) या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही.

शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनातून होणारी एकूण वजाती त्याच्या मासिक वित्त लच्चीच्या ५०% पेक्षा अधिक असता कामा नये.

वाहन अग्रीम व्याज दर

व्याज दराबाबत अन्य आदेश निर्गमित होईपर्यंत या आदेशान्वये मोटार सायकल / स्कूटर / मोपेड / दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिम प्रकरणी व्याजाची परिगणना वार्षिक ९% या दराने करावी. तसेच दुचाकी सायकल खरेदी अग्रिम हे व्याजरहित राहील.

Leave a Comment