Close Visit Mhshetkari

Employee Pension Scheme : नोकरदार वर्गासाठी आंदाची बातमी… ‘हायर पेंशन`साठी मिळाली मुदतवाढ लगेच येथे करा अर्ज?

EPFO Pension Rules : नोकरी करणाऱ्या अनेकांसाठीच त्यांच्या पगाराची आर्थिक गणितं, निवृत्तीवेतनासंदर्भातील तरतुदी, विविध भत्ते आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक लहानमोठी माहिती तितकीच महत्त्वाची असते. कारण, कळत नकळत त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर आणि गुंतवणुकीवरही याचे थेट परिणाम होत असतात. अशीच एक अत्यंत महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. 

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मंगळवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात ईपीएफओने म्हटले की ३ मे रोजी संपणारी अंतिम मुदत २६ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशाप्रकारे, पात्र कर्मचारी आता अधिक निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी २६ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील.

ईपीएफओने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर विद्यमान भागधारक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ३ मे २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले होते. या महत्त्वपूर्ण निर्णयात न्यायालयाने म्हटले होते की, ईपीएफओने आपल्या विद्यमान आणि माजी सदस्यांना उच्च निवृत्ती वेतनाची निवड करण्याची संधी दिली पाहिजे.

पेशन्स अधिक मिळवण्यासाठी पात्र कोण?

1995 साली या स्कीमची सुरुवात झाली, तेव्हा पेन्शनसाठी पात्र पगाराची मर्यादा होती दरमहा 5000 रुपये. कालांतराने ही मर्यादा वाढवण्यात आली – आधी 6,500 आणि नंतर 1 सप्टेंबर 2014 ला ती 15,000 करण्यात आली. म्हणजे आता ज्यांचं मूळ वेतन 15,000 रुपये आहे, त्यांना त्याच हिशोबाने पेन्शन मिळू शकतं.

पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचं वय किमान 58 असावं लागतं आणि त्यांनी किमान दहा वर्षं सेवा करून निवृत्ती घेतलेली असावी. जर ते 50 ते 57 या स्वेच्छानिवृत्ती अर्थात VRS घेतात तर त्यांना कमी

हे पण वाचा ~  NPS Calculator : एनपीएस खात्यात 10 हजार रुपये गुंतवणूक करून मिळवू शकता दरमहा 73 हजार पेन्शन! पहा सविस्तर

उच्च पेन्शनसाठी कागदपत्रे

  1. ईपीएफ योजनेच्या २६(६) अंतर्गत पर्यायाचा पुरावा
  2. नियोक्त्याने प्रमाणित केलेला पर्यायाचा पुरावा ११(३) अंतर्गत
  3. ठेवीचा पुरावा
  4. ५,००० किंवा रु. ६,५०० च्या पगार मर्यादेपेक्षा जास्त पगारावर पेन्शन फंडात जमा केल्याचा पुरावा
  5. APFC किंवा इतर कोणत्याही कडून नकार दिल्याचा लेखी पुरावा
हायर पेंशनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
  • हायर पेंशनचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथन ई सेवा पोर्टलला भेट द्या.
  • पेंशन ऑन हायर सॅलरीवर क्लिक करा.
  • तुम्ही एका नव्या पेजवर याल, जिथं तुम्हाला दोन पर्याय दिसतील.
  • 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेल्यांनी पहिला पर्याय निवडावा अपेक्षित असेल.
  • तुम्हीही नोकरी करत असाल तर तुम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल.
  • आता तिथे UAN क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक अशी माहिती भरा.
  • आता तुमच्या आधार कार्डशी जोडल्या गेलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल जो पोर्टलवर एंटर करा.
वाढीव पेन्शन साठीपंधरा दिवस मुदतवाढ

रोजगारदाता किंवा कंपनी यांच्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (EPFO) वाढीव पेन्शन हवे असल्यास त्यासाठी अर्ज करण्याच्या सोमवारी संपत असलेल्या मुदतीला ११ जुलैपर्यंत वाढ दिली आहे.आता 11 जुलैपर्यंत वाढीव पेन्शनसाठी अर्ज करता येईल.

वाढीव पेन्शन मिळून कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपश्चात आयुष्यासाठी अधिक रक्कम हाती मिळण्याची सोय आहे. याविषयीचा निर्णय सर्वो न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 दिला होता.

1 thought on “Employee Pension Scheme : नोकरदार वर्गासाठी आंदाची बातमी… ‘हायर पेंशन`साठी मिळाली मुदतवाढ लगेच येथे करा अर्ज?”

Leave a Comment