Close Visit Mhshetkari

Extra increment : खुशखबर … ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतन वाढ ? शासन निर्णय परिपत्रक निर्गमित …

Extra increment : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे शासन परिपत्रक समोर आलेले असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना आगाऊ स्वरूपात वेतन वाढ मिळणार आहेत. तर काय आहे हे परिपत्रक आणि कसा मिळणार लाभ याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

‘या’ कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ?

जिल्हा परिषदेकडील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबतचे सर्व समावेशक आदेश शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यांत आले आहेत. तथापि, त्यात आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी किंवा कसे याबाबतचा उल्लेख नव्हता.

दरम्यान अशा आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-याची सेवा ज्येष्ठता दुस-या जिल्हा परिषदेत शून्य होते असे सर्व जिल्हा परिषदांना दिनांक ३१ जुलै, १९९७ च्या शासन पत्रानुसार कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ द्यावी किंवा कसे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Extra increment for employees

आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेल्या अशा कर्मचा-यांचा त्याच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे आगाऊ वेतनवाढीसाठी विचार करावयाचा झाल्यास, या विभागाच्या दिनांक ३१/१०/१९८९ च्या शासन आदेशानुसार जुन्या व नवीन जिल्हा परिषदेतील संबंधीत कर्मचा-याची एकाच पदावरील किमान सलग तीन वर्षे सेवा झालेली असावी. तसेच संबंधित कर्मचा-यांच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अभिलेख्यांची प्रतवारी दिनांक ३१-१०-१९८९ च्या शासन आदेशानुसार असावी.

हे पण वाचा ~  Salary budget : आता ' या ' सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा! शासन निर्णय निर्गमित

सररील आदेश पूर्वलक्षी प्रभावाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम २४८ नुसार प्रदान केलेल्या शक्तीनुसार लागू करण्यात येत आहेत.

आगाऊ वेतनवाढ शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

Extra Increment

प्रहार संघटनेकडून अंमलबजाणीची मागणी

आंतरजिल्हा बदलीने अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा य यवतमाळ जिल्हयात आलेल्या जि. प. शिक्षकांना एक आगाऊ वेत्तनवाढ मिळणेबाबत श्री. महेश ठाकरे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आंतरजिल्हा बदलीने अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा यवतमाळ जिल्हयात आलेल्या जि.प. शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ मिळणेचाबतचे संदर्भिय निवेदन या कार्यालयास दिले होते.

सदरच्या प्रकरणामध्ये संदर्भिय पत्रातील मुहयांच्या अनुषंगाने संदर्मिय निवेदनासोबत जोडलेल्या शासन आदेश दि.०३.१०.२००३ मधील तरतुदीनुसार उचित कार्यवाही नियमानुसार करण्यात यावी व केलेल्या कार्यवाही संदर्भात,संबंधीत प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांना आपले स्तरावरुन कळविण्यात यावे, ही विनंती उप आयुक्त (आस्थापना) अमरावती विभाग, अमरावती यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद अमरावती / अकोला / यवतमाळ / बुलडाणा / वाशिम यांना केली आहे.

Leave a Comment