Close Visit Mhshetkari

Public holiday list : मोठी बातमी … या जिल्ह्यात मकर संक्राती निमित्त सुट्टी जाहीर! पहा संपुर्ण जिल्ह्यांच्या स्थानिक सुट्टया ..

Public Holiday list : शासन निर्णय राजनैतिक व सेना विभाग क्रमांक सी-13 दोन बी दि. 16.01.58 व शासन अधिसुचना सामान्य प्रशासन विभाग क्र. सावेसु/स्था/1983/1781/(64)/83 29 दि.14.06.1983 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सन 2024 या वर्षासाठी स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

सार्वजनिक सुट्टी यादी 2024 – सोलापूर 

सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयासाठी खालील तीन दिवशी स्थानिक सुट्टया जाहीर करीत आहे.सदर स्थानिक सुट्ट्यांच्या दिवशी शासकीय कोषागारेदेखील बंद राहणार आहे.

  • दिनांक – 15/01/2024 – सोमवार – मकरसंक्रांत
  • दिनांक – 17/09/2024 – मंगळवार – अनंत चतुर्दशी
  • दिनांक – 31/10/2024 गुरुवार – नरक चतुर्दशी

नांदेड जिल्हा स्थानिक सुट्टया

नांदेड जिल्ह्यासाठी खालील तक्यामध्ये दर्शविण्यात आलेल्या यात्रा व सणाच्या दिवशी स्थानिक सुट्या जाहीर करीत आहे.

  • दि. 10/01/2024 – बुधवार – श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा
  • दि. 29/01/2024 – सोमवार – हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम बडी दर्गाह कंधार ऊर्स
  • दि. 11/09/2024 – बुधवार – जेष्ठा गौरी पूजन

स्थानिक सुट्या या नांदेड जिल्हयातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तसेच कोषागार व उप कोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील.तसेच हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच केंद्र शासनाची कार्यालये, आणि बँका यांना लागू होणार नाही.

हे पण वाचा ~  Public Holiday : नव्या वर्षात महाविद्यालयांना तब्बल ३१ शासकीय सुट्ट्या; विद्यापीठाचे सुट्यांचे वेळापत्रक जाहीर

सन 2024 स्थानिक सुट्टया – पुणे

पुणे सन 2024 या वर्षासाठी पुणे जिल्हयामधील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांसाठी खालील दिवस सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करीत आहे.

  • 17 सप्टेंबर 2024 (मंगळवार) अनंत चतुर्दशी
  • 31 ऑक्टोबर, 2024 (गुरुवार) नरक चतुर्दशी
  • 26 नोव्हेंबर, 2024 (मंगळवार) आळंदी यात्रा
परभणी जिल्हा सुट्टी यादी

जिल्हाधिकारी परभणी सन 2024 या वर्षाकरीता सुटटया या अधिसुनचेव्दारे जाहीर करीत आहे. प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी रघुनाथ गावडे (भा.प्र.से.) परभणी जिल्हा हद्दीत खालील दिवशी तीन स्थानिक जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • 02 फेब्रुवारी 2024- शुक्रवार – उर्स दर्गाह सयद तुराबल हक
  • 11 सप्टेंबर 2024- बुधवार- जेष्ठगौरी पुजन
  • 31 ऑक्टोबर 2024 – गुरुवार – दिपावली (नरक चतुर्दशी)

आपल्या जिल्ह्यातील सुट्टी यादी येथे पहा

Public Holidays list

स्थानिक सुट्टीचे क्षेत्र वर्धा

राजकिय सेवा विभागाच्या दि. 10 जानेवारी, 1958 च्या शासन निर्णय क्र. P-13 11 B यदि ऑगष्ट, 1958 च्या शासन निर्णयानुसार प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी यांनी सन 2024 या वर्षासाठी वर्धा जिल्हयाकरीता खालीलप्रमाणे स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.

  • अक्षय्य तृतीया – शुक्रवार – 10/05/2024
  • जेष्ठागौरी पुजन – बुधवार – 11/09/2024
  • नरक चतुर्दशी – गुरुवार – 31/10/2024

आदेश वर्धा जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणी अधिकोष (बॅक) यांना लागू होणार नाहीत.

Leave a Comment