Close Visit Mhshetkari

Upi Payment : मित्रांनो NEFT, RTGS, IMPS यामध्ये फरक काय असतो? केव्हा कोनता पर्याय वापरावा; पहा सविस्तर …

Upi Payment : आपल्या दैनंदिन व्यवहारातील किरकोळ पेमेंट करण्यसाठी Bhim, google pay, Phone PE यासारखे Upi Payment App वापरणे आता सर्वसामन्यांच्या अंगवळणी पडले आहे.परंतू व्यवसायिकांसाठी मोठी पेमेंट करण्यासाठी भीम/गुगलपे/फोनपे सुविधेचा वापर करणे शक्य होत नाही.

Difference Between NEFT, RTGS, IMPS

आज आपण नेफ्ट/आरटीजीएस/आयएमपीएस/ यामधील फरक पाहणार आहोत. मित्रांनो वास्तविक पाहता एनईएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएस हे तीनही पर्याय पैसे पाठवण्यासाठी सुरक्षित आणि सोयीचे आहेत,पण कोणता पर्याय केव्हा वापरावा हे आपलयाला माहिती नसते. तर चला पाहूया फरक…

NEFT Payment : (राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) हा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये, पैसे पाठवण्याचा दिवस आणि वेळ दोन्ही महत्त्वाचे असतात. 

एनईएफटीद्वारे पैसे पाठवण्याची वेळ सकाळी 8:00 ते रात्री 8:00 पर्यंत असतो. आपले पैसे पाठवल्यापासून लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा होण्यास 2 तास ते 4 तास लागू शकतात. एनईएफटीद्वारे किमान 2 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवता येतात.

RTGS Payment : रियल-टाइम ग्रॉस सेटलमेंट हा सर्वात वेगवान पर्याय आहे. आपण पैसे पाठवल्यानंतर लगेचच लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा होतात. आरटीजीएसद्वारे पैसे आपण सकाळी 9:00 ते संध्याकाळी 6:00 पैसै पाठवू शकतो.आरटीजीएसद्वारे किमान 2 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवता येतात.

हे पण वाचा ~  Google pay : आता गूगल पे वरून मिळणार १ लाख तात्काळ कर्ज; पहा सविस्तर माहिती ....

IMPS Payment : इमिडिएट पेमेंट सर्विस हा सर्वात सोयीस्कर पर्याय असून यामध्ये, पैसे पाठवण्याची प्रक्रिया 24 तास 7 दिवस उपलब्ध असते. 

आयएमपीएसद्वारे किमान 2 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवता येतात. मित्रांनो IMPS द्वारे पैसे पाठवण्यासाठी मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंगचा वापर करणे आवश्यक आहे.

UPI payment system

  • किरकोळ पेमेंट (रु. 2 लाखांपर्यंत) :- IMPS/NEFT
  • तातडीची पेमेंट (रु. 2 लाखांपर्यंत) : – IMPS
  • मोठी पेमेंट (रु. 2 लाखांहून अधिक) : – RTGS

थोडक्यात आपण आपल्या कर्जाचे हप्ते, क्रेडीट कार्ड बील NEFT ने करू शकता.विशेष म्हणजे एनईएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस यातील एनईएफटी/आरटीजीएस आरबीआयच्या नियंत्रणाखाली असून आयएमपीएस हे एनपीसीआय (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या नियंत्रणाखाली असते.

आपण वापरत असलेले Bhim, google pay, Phone PE यासारखे upi Payment हे IMPS प्लॅटफॉर्म वापरूनच होत असतात.

Leave a Comment