Student scholarship : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यातील इयत्ता १० वी व १२ वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणान्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना लागू करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यी प्रोत्साहन बक्षिस योजना 2023
आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, नामांकीत शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्याथ्र्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board) तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (C.B.S.E. Board) मधून गुणवत्ता यादीत प्राविण्यासह गुण मिळवून राज्यात प्रथम येणाऱ्या ५ मुले व ५ मुली तसेच राज्यातील ९ विभागीय शिक्षण मंडळामध्ये प्रत्येक शिक्षण मंडळात प्रथम येणाऱ्या ३ मुले च ३ मुलींना प्रोत्साहनपर बक्षिस योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
Education Scholarship for student
शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, सैनिकी शाळा, नामांकीत शाळांमध्ये शिकत असलेले इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board) मध्ये राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविणारे मुले व मुली यांचा समावेश असणार आहे.
SBI बॅंकेने आणली लहान मुलांसाठी पॉलिसी, पहा जबरदस्त फायदे
सन २०१९-२० व २०२०-२१ या कालावधीत कोविड-१९ च्या प्रादुर्भाव असल्याने या दोन वर्षासाठी सदर योजना न राबविता सन २०२२-२३ पासून राबविण्यात यावी. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर सर्वांना त्या क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम ११. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर देण्यात यावी.
विद्यार्थ्यी प्रोत्साहन बक्षिस योजना 2023 शासन निर्णय येथे डाऊनलोड करा