Leave Encashment : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे रोपीकरण हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरलेला आहे.अशातच पोलीस संवर्गातील कर्मचाऱ्यांना वर्षभरात 15 अतिरिक्त अजित रजेचे रोकीकरण रद्द करण्याचा आदेश निघाला होता. आता यामध्ये 24 तासात बदल करण्यात आला असून काय आहे सविस्तर
अर्जित रजा रोखीकरण बंद ?
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी लागू असलेल्या 15 अतिरिक्त रजेचे रोखीकरण रद्द करण्याचा निर्णय विद्यमान सरकारने घेतला होता, परंतु ओरड होतास सदरील निर्णय तात्काळ रद्द करण्यात आला आहे. एकीकडे पोलिसांना रजा घेण्याचे बंधन असताना,अर्जित रजेचे रोखीकरण रोखण्याचा निर्णय नेमका कोणाचा होता व तो तात्काळ रद्द का करण्यात आला याविषयी पोलीस दलात चर्चा सुरू आहे.
पोलीस संवर्गात नाराजीचा सूर !
अर्जित रजा रोकीकरण रद्द केल्यामुळे पोलीस दलातील विविध कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमावर संताप व्यक्त केला होता राज्याच्या नवीन नवीन पोलीस महासंचालक राष्ट्रीय शुल्क यांनी परिपत्रक जारी करून सेवानिवृत्त होणाऱ्या पोलिसांनी जाहीर सत्कार सोहळा स्वीकारून त्याच्या दोन्ही चित्रपट करण्यावर बंधने आणले आहेत.
सदरील परिपत्रक ताजे असतानाच पोलिसांना लागू असलेल्या १५ दिवसांच्या अतिरिक्त रजेचे रोखीकरण रद्द करण्यात आल्याचा शासन निर्णय जारी झाल्यामुळे पोलीस संतापले होते.
सरकारच्या म्हणण्यानुसार सातव्या वेतन आयोगानुसार पोलीस कर्मचारी व तसेच इतर कर्मचाऱ्यांना वेतनात भरीव वाढ दिलेली आहे.
अर्जित रजा रोखीकरण पुन्हा लागू
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे स्वरूप आणि तान विचारात घेऊन वीस दिवसाच्या नैमित्तिक रजा व पंधरा दिवसाच्या अर्जित रजा रोखीकरण सवलती सह मंजूर करण्यात आल्या होत्या.मात्र या पद्धतीत आता बदल करण्यात येत असून पोलीस शिपाई ते निरीक्षक यांना दरवर्षी १५ दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा अनुज्ञेय असेल. परंतु रजेचे रोखीकरण रद्द करण्यात आले होते.
आता सदरील निर्णय दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आला असून पूर्ववत अर्जित रजा रोखीकरण व नैमित्तिक रजा संदर्भातील शासन निर्णय लागू राहणार आहे त्यामुळे पोलीस वर्गातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.