Employees gratuity : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून सेवानिवृत्त झालेल्या हजारो शिक्षकांचे सेवा उपदान (gratuity) व पेन्शन अंशराशीकरण रकमा राज्य शासनाकडे थकीत असल्याची धक्कादायक बातमी सामोर आली आहे.
ग्रॅच्युईटी व वेतन आयोग थकित हप्ता
प्राथमिक शिक्षकांना ग्रॅच्युईटीची ३८६ कोटी ७० लाख ९२ हजार रूपयांची रक्कम सरकारकडून येणे बाकी आहे. मागील दीड ते दोन वर्षापासून सदरील रकमा थकीत असल्याची माहिती मिळत आहे.दि. ३१ मे २०२३ अखेर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सेवाउपदान स्वरूपात सरकारने देणे बाकी आहे.
राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या ग्रॅच्युईटीची एकूण ३८६ काेटींची रक्कम थकीत असून,या व्यतिरिक्त पेन्शन अंशराशीकरणाची व सातव्या वेतनाचे हप्ते देणे सरकारकडे बाकी आहे. – शिवानंद भरले, समन्वयक, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ
सेवानिवृत्त शिक्षकांची थकीत उपदान रकमेबाबत राज्यशासनाकडे मागणी केली असून, महाराष्ट्र राज्य शासनाने रक्कम मंजूरही केली आहे. आम्हाला रक्कम प्राप्त हाेताच संबंधित जिल्ह्याला वितरित केली जाईल. – शरद गाेसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग
Employees Gratuity Calculator
पश्चिम महाराष्ट्र
- पुणे – २७ काेटी २६ लाख
- नगर- १४ काेटी २४ लाख
- नाशिक – २४ काेटी ८३ लाख
- सांगली – १५ काेटी ९१ लाख
- काेल्हापूर – १४ काेटी २६ लाख
- सातारा – ८ काेटी ३७ लाख
- साेलापूर – ६ काेटी ६५ लाख
कोकण विभाग
- ठाणे १० काेटी ९१ लाख
- पालघर – ४ काेटी १० लाख
- रायगड – १५ काेटी ९० लाख
- रत्नागिरी – १० काेटी २४ लाख
- सिंधुदुर्ग- ४ काेटी २१ लाख
नाशिक विभाग
- धुळे- ३ काेटी ७८ लाख
- नंदूरबार- १ काेटी ९६ लाख
- जळगाव- २२ काेटी १९ लाख
विदर्भ विभाग
- बुलढाणा – १५ काेटी ५० लाख
- अकाेला- ७ काेटी ३५ लाख
- वाशीम – काेटी २९ लाख
- अमरावती – १४ काेटी ४३ लाख
- यवतमाळ- २० काेटी ८६ लाख
- वर्धा – ४ काेटी ९५ लाख
- नागपूर- ३१ काेटी ६१ लाख
- भंडारा- १७ काेटी ३३ लाख
- गाेंदिया- ७ काेटी १४ लाख
- चंद्रपूर १६ काेटी ४३ लाख
- गडचिराेली- २ काेटी ८५ लाख
मराठवाडा विभाग
- छत्रपती संभाजीनगर – ४ काेटी ७३ लाख
- बीड- २० काेटी ५८ लाख
- नांदेड – १५ काेटी ३८ लाख
- लातूर – १२ काेटी ६४ लाख
- हिंगाेली ५ काेटी २१ लाख
- उस्मानाबाद ३ काेटी ९२ लाख
- परभणी २ काेटी २९ लाख
- जालना ९५ लाख