Close Visit Mhshetkari

Child Income Tax : मुलांनी कमाई केली तर मग कोणाला भरावा लागतो इनकम टॅक्स ? पहा काय सांगतो आयकर खात्याचा नियम…

Child Income Tax : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली असून आहे. आपल्याला आता सोशल मीडियावर अनेक लहान मुले ऑनलाइन कमाई करत असल्याचे दिसत आहे युट्युब फेसबुक इंस्टाग्राम यावरून ते कमाई करत आहे .

अशा परिस्थितीमध्ये या कमाईवर आयकर कोण भरणार व आयकर कोणाला भरावा लागणार असा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळेस आयकर कायदा काय सांगतो? कोण भरणार कर याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया.

Child Income Tax Rule

मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे की सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे.अनेकजण कंटेट क्रिएटर्स, रील्स स्टार, इन्फ्लूएंन्सर झाले आहे. 

आपल्याला माहितीच आहे की लहान मुलं आपले कला दाखवून व आपली हुशारीने पैसे कमवत आहे. अशा वेळेस त्यांची उत्पन्न जर करपात्र असेल तर हा कर कोणी भरावा आणि याविषयी आयटीआर काय सांगतोय?

तुम्हाला माहिती नसेल परंतु लहान मुले हे दोन प्रकारे कमी करू शकतात एक तर त्यांनी स्वतः केलेली कमाई व दुसरी मालमत्ता नावावर झाल्यावर त्याची कमाई होते. संपत्ती जमीन मालमत्ता गिफ्ट मिळाल्यावर आई-वडिलांनी मुलाच्या नावावर गुंतवणूक केल्यावर त्यावरील व्याज अनर्जित उत्पन्नात राहते.

हे पण वाचा ~  Income Tax on HRA : बापरे ... 1 कोटींचा घरभाडे भत्ता? आयकर विभागाच्या रडारवर कर्मचारी; असा केला जात आहे पॅनचा बेकायदेशीर वापर ...

आयकर कायद्याच्या कलम 64 (1ए) नुसार लहान मुलं कमाई करत असेल तर त्याला कर द्यावा लागत नाही. हे उत्पन्न त्याच्या   आई-वडिलांच्या उत्पन्नात जोडण्यात येते. करपात्र उत्पनानुसार त्यावर कर भरावा लागतो.

इन्कम टॅक्स अपडेट्स

कलम 10(32) अंतर्गत मुलांची वार्षिक 1500 रुपयांपर्यंतची कमाई कर परीघाबाहेर आहे. त्यावरील उत्पन्न नियम 64(1A) अंतर्गत आई-वडिलांच्या उत्पन्नामधे जोडले जाते.

आई वडील दोन्हीही कमी कमाई करणारे असेल तर मूल आणि पालक यांच्यापैकी ज्यांचे उत्पन्न अधिक राहते त्या उत्पन्नावर नियमानुसार कर भरावा लागतो. जर लहान मुलाला लॉटरी लागली तर त्यावर 30 टक्के टीडीएस कापण्यात येतो. त्यावर 10 टक्के सर चार्ज व 4 टक्क्याचा सेस द्यावा लागतो.

कमाई करणारा मुलगा जर अनाथ असेल. तर त्याच्या कमाईवर स्वतः त्याला कर द्यावा लागतो.Section 80U नुसार मुलगा अपंग असेल व त्याचे अपंगत्व 40 टक्के पेक्षा अधिक असेल. तर त्याची उत्पन्न पालकाच्या उत्पन्नात जोडले जात नाही.

Leave a Comment