Close Visit Mhshetkari

Mobile SIM Card : किती दिवस रिचार्ज न केल्यास सिम कार्ड बंद होते; दुसऱ्याच्या नावावर कधी इश्यू होते ?

Mobile SIM Card : सध्या अनेकांकडे दोन सिम कार्ड असतात. त्यामागील कारण सुध्दा ही वेगवेगळी असतात.बहुतेक वेळा आणीबाणीच्या परिस्थितीसाठी किंवा बाहेरगावी गेल्यावर नेटवर्कचा प्रॉब्लेममुळे एकापेक्षा जास्त SIM कार्ड वापरले जाते.

स्मार्टफोनमुळे असो किंवा गरजेनुसार 2 सिम कार्ड बाळगतात.पर्सनल आणि प्रोफोशन कामासाठी 2 सिम कार्ड सहसा वापरले जातात.पण अनेक वेळा तुम्ही तुमचे सिम कार्ड रिचार्ज विसरून जाता किंवा पैशामुळे रिचार्ज करत नाही.अशावेळी तुमचे सिम कार्ड बंद होऊ शकते.

When closed unused SIM Card

जर तुम्ही तुमचे सिम कार्ड 60 दिवस (दोन महिने) रिचार्ज केले नाही तर ते निष्क्रिय केले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या सिम कार्डवर कॉल करणे,SMS पाठवणे किंवा इंटरनेट वापरणे शक्य होणार नाही.

हे पण वाचा ~  Vivo 5G smartphone : 5000mAh ची बॅटरी सह 256GB स्टोरेज;Vivo ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, पहा किंमत ...

निष्क्रिय सिम कार्ड 6 ते 9 महिने निष्क्रिय राहते. या काळात तुम्ही ते पुन्हा रिचार्ज करू शकता. जर तुम्ही या काळात तुमचे सिम कार्ड रिचार्ज केले तर ते सक्रिय होईल.

जर तुम्ही 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीत तुमचे सिम कार्ड रिचार्ज केले नाही तर ते अमान्य केले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला ते पुन्हा वापरता येणार नाही.

बंद सिम कार्ड काही महिन्यांतच दुसऱ्या युजरला ट्रान्सफर केले जाते. या प्रक्रियेला साधारण एक वर्षाचा कालावधी लागतो.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment