Close Visit Mhshetkari

Tax Saving tips : नवीन वर्षात पगारावरील टॅक्स वाचवायचा आहे का ? मग हे आहेत उपाय ! परताव्यासह कर सवलत …

Tax Saving Tips 2024 : मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर 2024 सालासाठी आयकर म्हणजेच ITR भरण्यास सुरुवात झालेली आहे.

तत्पूर्वी सर्वजण सध्या आयकर बचत कशी करता येईल याची वेगवेगळी माहिती घेत आहेत आज आपण रिस्तर आणि आपल्याला उपयोगी पडेल अशा, टॅक्स सेविंग स्कीम बद्दल माहिती सांगणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा

Income Tax Saving Tips

मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कर नियोजनाचा मुहूर्तही सुरू झाला आहे 31 मार्च 2024 पूर्वी तुमच्या कमाईतून कर बचत करण्यासाठी तुम्ही योग्यरीत्या नियोजन करायला पाहिजे. आयकर कायदा 1971 अंतर्गत तरतुदीमध्ये नुसार आपल्या पगारातील व्यक्तीला खर्च करावयाच्या गोष्टी व बचतीच्या बाबींना सुद्धा आपण कर सूट पर्यायामध्ये वापरू शकतो.

आपल्या पगाराच्या कमाईतून बचत करण्याचे दोन मार्ग आहेत पहिला म्हणजे सरकारच्या करमुक्त योजनांमध्ये पैसे गुंतवणे आणि दुसरा म्हणजे तुमच्या पगारातून अशा कपातीचा दावा करणे यावर सरकार सूट देते चला तर आज आपण बघूया असे कोणते मार्ग आहेत ज्याद्वारे आपण आपला आयकर बचत करू शकतो.

कर बचतीचे फायदेशीर मार्ग

80C अंतर्गत सरकार विविध प्रकारच्या गुंतवणुकींवर कर सूट देते. या गुंतवणुकींमध्ये गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, एलआयसी, जीवन विमा, एनएससी, एनपीएस, पीपीएफ, सुकन्या समृद्धि योजना, इत्यादींचा समावेश होतो. या गुंतवणुकींचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या वार्षिक उत्पन्नावरून १.५ लाख रुपयांपर्यंत कर बचत करू शकता.

Home loan :- गृहकर्जावर मूळ रकमेवर १.५ लाख रुपयांपर्यंत आणि व्याजावर दोन लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते.

Education loan :- शैक्षणिक कर्जावर भरलेल्या व्याजावर १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते.

Business Benefits :- व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित खर्चावर कर कपातीचा दावा करता येतो. यामध्ये प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च, विक्री खर्च, इत्यादींचा समावेश होतो.

हे पण वाचा ~  Income Tax Return : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ITR भरण्याची मुदत वाढवली, कोणाला होणार फायदा?

Agriculture income :- शेतीतून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे.

Saving interest :- बचत खात्यावर जमा रकमेवरील व्याजावर १०,००० रुपयांपर्यंत सूट मिळते. ज्येष्ठ नागरिकांना ५०,००० रुपयांपर्यंत सूट मिळते.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली :- NPS म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला ८० अंतर्गत जवळपास 50 हजार रुपयाचा अतिरिक्त लाभ मिळतो 

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) :- आपल्या पीएफ किंवा जीपीएफ खात्यात आपण बचत करण्यात असलेल्या भविष्य निर्वाह निधीतील कपातीवर सुद्धा आपल्याला टॅक्स बचत करता येते.

विमा पॉलिसीमधून मिळालेले पैसे :- कलम १०(१०)डी अंतर्गत १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जारी केलेल्या विमा पॉलिसींवर (ULIP वगळता) कर भरावा लागेल,जर त्यावरील वार्षिक प्रीमियम पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.

National Savings Certificate : – NSC ही सुद्धा एक सुरक्षित गुंतवणूक मान्यते कोणताही भारतीय नागरिकांना यामध्ये गुंतवणूक करता येत असून एक हजार रुपयांपासून यामध्ये आपण बचत करू शकता. 80C अंतर्गत या सवलतीमध्ये फायदा मिळतो. 

सुकन्या समृद्धी योजना :– आपल्या घरात जर मुलगी असेल तर या योजनेमध्ये आपण पैसे बचत करू शकता. यामध्ये सुद्धा आपल्याला कर सवलत मिळत असते.

आयकर बचत योजना

वारसाने मिळालेली संपत्ती :- वारसा हक्क किंवा मृत्युपत्राद्वारे वारसाला मिळालेली मालमत्ता करमुक्त आहे.

NRE खाते :- भारताबाहेर राहणार्‍या भारतीय नागरिकांची NRE खाती असतात, ज्यात जमा आणि मुदत ठेवींवर व्याज मिळते जे करमुक्त असते.

हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) आणि अतिरिक्त उत्पन्न :- आयकर कायद्यांतर्गत हिंदू अविभक्त कुटुंबाच्या श्रेणी अंतर्गत स्वतंत्र कर सूट उपलब्ध आहे. यामध्ये सर्व सदस्यांना स्वतंत्र सूट दिली जाते आणि २.५ लाख रुपयांची मूळ करसूट देखील उपलब्ध आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment