Smart Solar Panel : सध्या जगभरामध्ये सोलर पॅनल चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे वाढते विज बिल आणि लोड शेडिंग च्या कारणामुळे यामध्ये वाढ होताना दिसत आहे. आता असाच एक इकोफ्लो डेल्टा प्रो अल्ट्रा सादर करण्यात आला आहे.
हा एक स्मार्ट हायब्रीड पॉवर जनरेटर असून याचा वापर घरात आणि घराबाहेर येऊ शकतो स्मार्टफोन पासून आपल्या घरातील सर्वच गरजा याद्वारे भागवता येऊ शकतात यामध्ये फॅन टीव्ही इन्व्हर्टर फ्रिज याचा सुद्धा समावेश आहे.
Portable Backup Solar system
मित्रांनो आपल्याला माहिती आहे की स्मार्टफोनच्या चार्जिंग साठी आपण आपल्याजवळ पावर बॅंक चा वापर करतो वीज झाल्यानंतर अंधार पडू नये म्हणून आपण वापर करतो अशावेळी क्लास वेगासमध्ये चालू असलेल्या टेकव्हेंट CES 2024 दरम्यान एक विशेष उत्पादन सादर करण्यात आले आहे. डेल्टा प्रो अल्ट्रा असे या उत्पादनाचे नाव असून ते इकोफ्लो नावाच्या कंपनीने सादर केले आहे.
कंपनीने असा दावा केला आहे की, ही जगातील सर्वात शक्तिशाली स्मार्ट हायब्रिड संपूर्ण-हाउस बॅटरी जनरेटर आणि बॅकअप प्रणाली आहे. विशेष म्हणजे याला चार्ज करण्यासाठी सौरऊर्जा आणि गॅसचाही वापर केला जाऊ शकतो, परंतु यासाठी एक अतिरिक्त उपकरण जोडावे लागेल. मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती मिळाली आहे.
पोर्टेबल बॅकअप सिस्टम किंमत
इकोफ्लो डेल्टा प्रो अल्ट्राची किंमत इकोफ्लो डेल्टा प्रो अल्ट्रा इन्व्हर्टर आणि बॅटरी किटची किंमत 4,999 यूएस डॉलर आहे. भारतीय चलनात रूपांतरित केल्यास, ही किंमत सुमारे 4,14,841 रुपये होते.
Smart Home Panel 2 ची किंमत US $1,599 आहे. भारतीय चलनात रूपांतरित केल्यास, ही किंमत सुमारे 1,34,522 रुपये होते. इकोफ्लो डेल्टा प्रो अल्ट्राची एकूण किंमत, Smart Home Panel 2 सह, सुमारे 5,59,363 रुपये होते.
इकोफ्लो डेल्टा प्रो अल्ट्रा – वैशिष्ट्ये
- 6kWh बॅटरी क्षमता
- 7200W आउटपुट
- 5.6kW सोलर पॅनल इनपुट
- स्वयंचलित स्विचओव्हर
- वाढीव बॅकअप
- ऊर्जा कार्यक्षमता
- पोर्टेबल बॅकअप प्रणाली
- सोलर पॅनलसह संपूर्ण घरासाठी 1 महिन्याचा बॅकअप