Student examEducation policy : स्टार्स प्रकल्प मधील SIG अंतर्गत सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
New education policy
सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
सदरील चाचणी एकूण दहा माध्यमात चाचणी होणार आहे. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवी च्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (विद्यानिकेतन / सराव पाठशाळा, समाजकल्याण विभाग (शासकीय), आदिवासी विकास (शासकीय), जिल्हा परिषद, मनपा, नपा, नप, शासकीय सैनिकी शाळा, कटक मंडळ, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल) या शाळांमधील विद्यार्थ्याच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक चाचण्यांचा पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात येणार आहे.
नियतकालिक मुल्यमापन चाचणी
सन २०२३ – २४ या शैक्षणिक कालावधीत इयत्ता ३ री ते ८ वी च्या इयत्तांसाठी तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत. संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १ व २ या संकलित मूल्यमापन चाचणीच्या अनुषंगाने आहेत. यामुळे शाळांनी इयत्ता ३ री ते ८ वी (प्रथम भाषा, गणित व इंग्रजी) या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी पुन्हा नव्याने घेण्यात येणार नाही.
नियतकालिक मुल्यमापन वेळापत्रक व अभ्यासक्रम येथे पहा 👉 नियतकालिक चाचणी
सदरील चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात येईल. संबंधित चाचण्यांची गुणनोंद सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये घेण्यात येईल. तसेच इतर विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित १ व २ चे मूल्यमापन करण्यात येणार आहे.
इयत्ता तिसरी -आठवी मूल्यमापन शासन परिपत्रक येथे पहा – मूल्यमापन परिपत्रक
कधी होतील