Income Tax on HRA : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, आयकर बचतीसाठी लोक वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात. यामध्ये सरास वापरला जाणारा मार्ग म्हणजे घर भाडे पावती. गेल्या अनेक वर्षांपासून लोक अशा प्रकारे कर वाचवत आहेत. आयकर विभागाने आता या लोकांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
Income Tax HRA Fraud
आयकर वाचवण्यासाठी अनेक लोकांनी बनावट घरबडी पावती जमा केल्याची बाब आयकर विभागाच्या लक्षात आलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून लोक अशा प्रकारचे टॅक्स वाचवण्याचे मार्ग अवलंबत असल्याने आयकर विभागाने आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.
मित्रांनो सध्या आयकर विभाग बनावट घर भाडे पावत्या सादर करून कर बचत करण्याचा दावा करत असलेल्या ग्राहकांना नोटीस पाठवत आहेत. आत्तापर्यंत किमान आठ हजार ते दहा हजार मूल्याची प्रकरणे सापडले आहेत ज्यांची रक्कम दहा लाख ते त्यावरून अधिक आहे.
एका व्यक्तीकडून सुमारे १ कोटी रुपयांच्या भाड्याच्या पावत्या दाखल करण्यात आल्यानंतर सुधारित प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे आयकर विभागाने आता सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही व्यक्तींनी त्यांच्या मालकांकडून कर कपातीचा दावा करण्यासाठी पॅन कार्डचा गैरवापर केला होता. काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कर कपातीचा दावा करण्यासाठी एकाच पॅनचा वापर केल्याची प्रकरणे आता अधिकाऱ्यां समोर आली आहेत.
सध्या TDS फक्त 50,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक भाडे किंवा 6 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक पेमेंटसाठी लागू आहे. त्यामुळे, कर भरावा लागू नये म्हणून बरेच कर्मचारी लाभाचा गैरवापर करत आहेत.
घरभाडे भत्ता (HRA) म्हणजे काय?
HRA म्हणजेच घर भाडे भत्ता हा मुळात कर्मचाऱ्यांना दिला जातो नियुक्त किंवा कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्याला त्यांच्या घराचे भाडे देण्यासाठी हा पत्ता देते आयकर कायद्याच्या कलम 10(13A) अंतर्गत, HRA वर कर सूट काही मर्यादांच्या अधीन राहून मिळू शकते.
पगारदार अशी व्यक्ती जिच्या पगारात विचारे समाविष्ट आहे आणि जो भाड्याच्या घरात राहतो तो त्याच्या याच्या सुरुवात मिळणाऱ्या उत्पन्नावर कर वाचवू शकतो. स्वत:चा रोजगार असलेल्या व्यक्तीला HRA वर कर सवलतीचा लाभ मिळत नाही.