Accidental Vima : शासकीय कर्मचार्यांची विमा योजना 1982 पासून अंमलात आली असून 1 मे 1982 रोजी शासकीय सेवेत असणाऱ्या किंवा त्या तारखेनंतर प्रवेश केलेल्या अनिवार्य असलेल्या सर्व कर्मचार्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे.
कर्मचार्यांना विमा संरक्षण योजनेचे दुहेरी लाभ मिळतो एक म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना सेवेतील मृत्यू झाल्यास विमा तर दुसरा म्हणजे निवृत्तीनंतर आर्थिक मदत मिळणे.
समूह वैयक्तिक अपघात विमा
राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना आणि राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-1982 या स्वतंत्र असते.
सरकारी कर्मचारी सेवेत असतांना सदस्याचा अपघाताने मृत्यु झाल्यास राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना-1982 अंतर्गत देय विमा निधी रक्कमे व्यतिरीक्त समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेखालील लाभ देय असतो.
Group Insurance new Rule
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेत खालील सुधारणा करण्यात आलेले आहेत.
शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१५/प्र.क्र.४५/विमा प्रशासन, दि.०४ फेब्रुवारी, २०१६ मधील परिच्छेद क्र.९ मध्ये “प्रत्येक वर्षाच्या मार्च अखेर सेवा निवृत्तीसाठी ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू ठरणार नाही.” ही तरतूद वगळण्यात आली आहे.
शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१७/प्र.क्र.६९/विमा प्रशासन, दि.११ ऑगस्ट, २०१७ मधील परिच्छेद क्र.१२ मध्ये “माहे एप्रिल ते माहे सप्टेंबर या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू ठरणार नाही.” ही तरतूद वगळण्यात आली आहे.
खाजगी अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना हा विमा लागू होतो का?