Close Visit Mhshetkari

Nps Exit Rule : पेन्शनर्ससाठी महत्वाची बातमी! NPS मधून पैसे काढण्याचा नियम बदलला, जाणून घ्या काय आहेत नवे नियम

NPS Exit Rules : राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे NPS खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा योजनेतून बाहेर पाडण्याचे नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

NPS Exit Rule Change

नाविन राष्ट्रीय पेन्शन योजना एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना असून ज्याची सुरुवाती २००४ मध्ये करण्यात आली. सुरुवातीला फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेत गुंतवणूक करता होती, पण २००९ मध्ये योज सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.

तुम्ही NPS मध्ये एक हजार रुपये दरमहा गुंतवणुकीतून सुरुवात करू शकता आणि ७० वर्षापर्यंत सुरू ठेवू शकता.

नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये कर कपातीचा लाभ आणि वार्षिक ५०,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त कर सवलत मिळू शकते. भारतातील १८ ते ७० वर्षीय कोणताही व्यक्ती देशातील कोणत्याही बँकेत NPS खाते उघडू शकतो.

NPS नियमांमध्ये बदल

CRA पेनी ड्रॉपची पडताळणी करण्यात अयशस्वी झाल्यास NPS मधून बाहेर पडण्याची किंवा पैसे काढण्याची कोणतीही विनंती, ग्राहकाच्या बँक खात्यातील डेटामध्ये बदल स्वीकारला जाणार नाही असेही पेन्शन रेग्युलेटरी ऑथॉरिटीने स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा ~  NPS Balance : आपल्या NPS खात्यातील रक्कम दोन मिनिटांत तपासा ऑनलाईन मोबाईलवर;

पेनी ड्रॉप अयशस्वी झाल्यास ग्राहकाच्या बँक खात्याच्या तपशिलांमध्ये बदल करण्याबाबत संबंधित नोडल कार्यालयात विहित प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जाईल. विशेष म्हणजे CRA पेनी ड्रॉप अयशस्वी झाल्यास ग्राहकाला त्याच्या मोबाइल नंबर आणि ईमेलद्वारे सूचित केले जाईल.

NPS मधून बाहेर पाडण्याचे नियम

  • PFRDA च्या नियमांनुसार ग्राहकाने NPS योजनेत जमा केलेली एकूण रक्कम आणि व्याज 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला संपूर्ण रक्कम एकत्र काढण्याची मुभा आहे.
  • 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास ४०% रक्कम पेन्शनसाठी ठेवली जाईल आणि उर्वरित ६० % रक्कम काढता येईल.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment