Old pension : जुना पेन्शन योजना संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता आणखी एका राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे त्यामुळे साहजिकच सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.
Old pension scheme
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी 11 सप्टेंबर रोजी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.तमांग म्हणाले की, समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. एक कुटुंब एक नोकरी लवकरच नियमित केली जाईल.
डेब्रुंग, नामची येथे वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिच्युअल ट्रस्टच्या पायाभरणी समारंभात मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी इतर अनेक घोषणा केल्या आहेत.जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करणे सेवानिवृत्त व्यक्तींच्या आर्थिक सुरक्षेचे महत्त्व ओळखून मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.
महाराष्ट्र जुनी पेन्शन योजना अपडेट्स
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा 14 मार्च 2012 23 रोजी लक्षणीय आंदोलन केले होते त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सदरील आंदोलन मागे घेऊन जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमली होती. त्याचबरोबर केंद्र सरकारने सुद्धा एमपीएससी योजनेत बदल करण्यासंदर्भात एक राष्ट्रीय समिती नेमलेली आहे.
जुनी पेन्शन अभ्यास समितीचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. तरी इतर राज्यांनी लागू केलेल्या पेन्शन मुळे केंद्र सरकार तसेच महाराष्ट्रातील सरकार वरती आता दबाव वाढत चाललेला असून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेले आहे.