Close Visit Mhshetkari

Nps new update : राष्ट्रीय पेन्शन योजना नविन कार्यपद्धती शासन निर्णय आला! सेवानिवृत्ती, सेवासमाप्ती आणि वारसाला अशी मिळणार रक्कम..

Nps new update : शासन निर्णयान्वये राज्य शासनाने दि.१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली आहे.

Nps withdraw new rule

राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून,दि.१ एप्रिल २०१५ पासून सदर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील स्तर-१ ची राज्यांतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली स्विकारुन आठ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे व राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येक टप्प्यावर (उदा. नोंदणीकरण / मासिक अंशदाने वेळेत जमा करणे / अंशतः रक्कमा काढणे / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमधून बाहेर पडणे इत्यादीसाठी) होणारा विलंब मा. महालेखापाल यांच्या लेखापरिक्षणाच्या अहवाल १३, वर्ष २०२० मध्ये त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अंमलबजावणीमधील त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्यासमवेत झालेल्या दिनांक २६.०८.२०२२, १५.०२.२०२३ व १५.०५.२०२३ रोजीच्या कार्यात्मक आढावा बैठकीमध्ये निदर्शनास आला आहे.

हे पण वाचा ~  Family pension : खुशखबर... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! आता...

राष्ट्रीय पेन्शन योजना नविन नियम

सद्य:स्थितीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांचेकडील कार्यपध्दतीस अनुसरुन विविध स्वरुपाच्या नवीन कार्यपध्दती राज्यस्तरावर स्विकारण्यात आल्या असून, सदर कार्यपध्दतीतील कालमर्यादेमध्ये बदल करणे आवश्यक आहे.

एनपीएस रक्कम काढणे,वारस रक्कम नवीन कार्यपध्दती संदर्भात शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

NPS शासन निर्णय

प्रतिनियुक्तीवरील अधिकारी/कर्मचारी यांच्याबाबत प्रान जनरेशन,मासिक अंशदाने जमा करणे, अंशतः रकमा काढणे, राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीमधून बाहेर पडणे इ. अंमलबजावणीमध्ये विलंब होत.

DCPS Amount

शासनाचे निदर्शनास आले असून, राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा कोषागार अधिकारी, आहरण व संवितरण अधिकारी, शासकीय कर्मचारी यांच्या स्तरावर पार पाडावयाच्या विहीत कार्यवाहीच्या कालमर्यादेमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाहीच्या प्रत्येक टप्यावर पार पाडावयाची कालमर्यादा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

सर्व आहरण व संवितरण अधिकारी,जिल्हा कोषागार अधिकारी / अधिदान व लेखा अधिकारी यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये नमूद केलेल्या कार्यपध्दतीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

1 thought on “Nps new update : राष्ट्रीय पेन्शन योजना नविन कार्यपद्धती शासन निर्णय आला! सेवानिवृत्ती, सेवासमाप्ती आणि वारसाला अशी मिळणार रक्कम..”

Leave a Comment