Close Visit Mhshetkari

Increment hike : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेत बदल ! नवीन शासन निर्णय निर्गमित …

Increment hike : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

आश्वासित प्रगती योजना शुद्धीपत्रक

महाराष्ट्र शासनवित्त विभागाच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २(ब) (३) वगळण्याचे आणि परिच्छेद क्रमांक २(क) (१) मध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.सदर प्रकरणी उपरोक्त नमूद शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.

वित्त विभागाच्या क्रमांक: वेतन-११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २ (ब) (३) “विवक्षित सेवाकालावधीनंतर, संबंधित पदाच्या कर्तव्ये व जबाबदारीत वाढ न होता, अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचनेचा (Non functional pay structure) मंजूर करण्यात आलेला / येणारा लाभ हा या योजनेखालील पहिला लाभ समजण्यात येईल.उदा. मंत्रालय/विधानमंडळ सचिवालयातील कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षाच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली अकार्यात्मक वेतनसंरचना” हा परिच्छेद पूर्णतः वगळण्यात आला आहे.

हे पण वाचा ~  State employees : खुशखबर .... जुनी पेन्शन योजना, ग्रॅज्युटी रक्कम, सेवानिवृत्ती 60 वर्ष, आश्वासित प्रगती योजना संदर्भात सरकार घेणार लवकरच मोठा निर्णय

आता वित्त विभागाच्या क्रमांक: वेतन-११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २(क) (१) मधील “तथापि, या योजनेतील पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतनसंरचना मंजूर करण्यात आली आहे,त्या पदाला विवक्षित सेवाकालावधीनंतर, त्या पदाच्या कर्तव्ये व जबाबदर्यांमध्ये वाढ न होता, अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना मंजूर करण्यात येत असेल, तर ती अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना दुसरा लाम म्हणून मंजूर करण्यात येईल.” हे वाक्य वगळण्यात आले आहे.

सदर आश्वासित प्रगती योजना शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आज उपलब्ध करण्यात आले आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment