Close Visit Mhshetkari

DA Hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! आज महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय होणार ?

DA Hike : महाराष्ट्रातील शिंदे सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज बुधवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढणार!

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. नुकताच केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून डीए 46 टक्के दराने देण्याची घोषणा केली होती.

आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता मध्ये वाढीचे गिफ्ट देण्यात येणार आहे.थोडक्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सुद्धा 46 टक्के दराने मिळणार आहे.

हे पण वाचा ~  DA Calculator : सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळणार मोठे गिफ्ट ! महागाई निर्देशांक आकडेवारी जाहीर

Employees Dearness allowance hike 

आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस महागाई भत्ता मध्ये वाढ केली जाते.जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई निर्देशांकाच्या आकड्या आधारे महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येते.

राज्य सरकारनं यापूर्वीच महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1.7.2023 पासून  4 % वाढीव महागाई भत्ता लागू केला होता.

Leave a Comment