Close Visit Mhshetkari

Child care leave : सरकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भात सरकारकडून मोठा निर्णय

CChild care leave : सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून आता सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा अधिकार्‍याला रजेवर जाण्यापूर्वी नियमांचे पालन करावे लागणार आहे.

बालसंगोपन रजा वाढणार?

संसदेत 2016-2017 मध्ये मातृत्व लाभ संशोधन विधेयक मंजूर करण्यात आले होते.ज्यामुळे यापूर्वी मिळणाऱ्या 3 महिन्यांच्या बालसंगोपन रजा वाढवून 6 महिन्यांपर्यंत करण्यात आले आहे.

आता निती आयोगाचे सदस्य डॉ. वी. के पॉल यांच्या विधानानुसार सरकारी आणि खासगी संस्थांमधील महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजेचा कालावधी 6 महिन्यांऐवजी आता 9 महिने करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे समोर आले होते. 

Employees maternity leave

लोकसभेत केंद्र सरकारकडून असे सांगण्यात आले की महिला आणि एकल पुरुष सरकारी कर्मचारी 730 दिवसांच्या बालसंगोपन रजेसाठी (CCL) पात्र आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात म्हटले आहे की, महिला आणि एकल पुरुष सरकारी कर्मचारी 18 वर्षांपर्यंतच्या दोन मोठ्या मुलांची काळजी घेण्यासाठी 730 दिवसांची बाल संगोपन रजा घेऊ शकणार आहे.

महिला कर्मचारी रजा नियम ?

नागरी सेवा (रजा) अधिनियम, 1972 च्या नियम 43 – C अंतर्गत केंद्रीय नागरी सेवा आणि पदांवर नियुक्त केलेल्या महिला सरकारी नोकरदारांना बाल संगोपन रजेसाठी पात्र असणार आहे.

  • 18 वर्षांपर्यंतच्या दोन सर्वात मोठ्या मुलांच्या काळजीसाठी संपूर्ण सेवेदरम्यान जास्तीत जास्त 730 दिवसांच्या कालावधीसाठी बाल संगोपन रजा घेऊ शकतात.
  • अपंग मुलाच्या बाबतीत वयोमर्यादा नाही.
  • एका कॅलेंडर वर्षात तीन टप्प्यांपेक्षा जास्त नाही.
  • नियमांनुसार, एकल महिला कर्मचाऱ्याच्या बाबतीत CCL एका कॅलेंडर वर्षात तीन ऐवजी सहा वेळा वाढवता येईल.
  • प्रसूती रजा नियम
  • सरकारी महिला कर्मचाऱ्यांना गरोदरपणात १८० दिवसांसाठी प्रसूती रजेसाठी पात्र असतात.
  • गर्भपात झाल्यास महिला कर्मचार्‍याला संपूर्ण सेवेदरम्यान 45 दिवस रजेचा अधिकार असतात.
हे पण वाचा ~  Employees Allowance : कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक.. सरकार लवकरच घेणार राज्य कर्मचाऱ्यांच्या आर्थिक फायद्याचा 'हा' निर्णय, पहा..
पुरुष कर्मचारी रजा नियम

पत्नीच्या प्रसूतीनंतर कर्मचाऱ्यांना पत्नी बरी होईपर्यंत पुरुष कर्मचार्‍यांना दोन मुलांसाठी 15 दिवसांची पितृत्व रजा मिळते. तसेच एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेतल्यास पुरुष कर्मचारी दोनपेक्षा जास्त हयात असलेल्या मुलांसाठी सुध्दा सदरील रजा घेता येते.

This article has been written by Raj Kakad from Maharashtra.He is a famous Marathi Blogger, Website Developer and Administrator of MahEmployees.com

3 thoughts on “Child care leave : सरकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भात सरकारकडून मोठा निर्णय”

  1. कृपया कं त्रा टी कर्मचारी कायम करण्याचा gr आदेश द्या त्यांना 7 वा वेतन वाढ कशी द्यायची ते सांगा

    Reply

Leave a Comment