UPI payment : मित्रांनो आजकालच्या जमान्यामध्ये क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करणे सोपे झाले आहे अनेकदा आपण अनावधानाने आपल्या डिटेल्स सहज देऊन टाकतो. यामुळे मोठा धोका उद्भवू शकतो, तर अशावेळी कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
Credit card new rules
आपण बऱ्याच वेळा कोणता विचार न करता कार्ड स्वाईप करतो किंवा ऑनलाईन माहिती सरळ देऊन टाकतो परंतु लोकांसोबत असं काही घडतं की त्यांना फोन येतो आणि बँकेच्या किंवा शॉपिंग वेबसाईट च्या नावाने कार्ड तपशील विचारला जातो आणि लोक यामध्येच फसतात आणि तपशील शेअर करतात.
आता अशावेळी कार्ड स्वाईप करताना किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी याचा विचार आपण करूया मित्रांनो बऱ्याच वेळा दरम्यान, कार्ड सुरक्षित करण्यासाठी, एन्क्रिप्शन आणि इतर सुरक्षा पद्धती वापरल्या. जसे की तुमचा ऑनलाइन सेव्ह केलेला डेटा एनक्रिप्ट करणे.
याशिवाय पेमेंट कार्ड डेटा अनअर्जृतपणे पाहणे कॉपी करणे किंवा स्कॅन करणे यापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा अनेक पावले उचलता येऊ शकतात.
तुमच्या कार्डचे तपशील फोनवर शेअर करणे असो किंवा ऑनलाइन माहिती टाकण्यासारखे प्रकार असो.
Online payment security tips
- बराच वेळा आपल्याला आपल्या मोबाईल वरती फेक कॉल येतात आणि तुमच्या कार्डच्या तपशीलाची फेर तपासणी करायची आहे असं सांगून किंवा व्हेरिफिकेशन च्या नावाखाली आपल्याकडून अपडेट घेतात.अशा वेळी आलेला कॉल बंद करा आणि आपली डिटेल देऊ नका काही शंका आल्यास आपल्या एटीएम कार्ड वरती दिलेल्या टोल फ्री नंबर वरती संपर्क करा.
- स्कॅमर्स अनेकदा मोठ्या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं भाषण तुमचं पेमेंट यशस्वी झाले आहे किंवा डिलिव्हरी रिलीज करण्यासाठी पेमेंट करणे आवश्यक आहे असं पटवून सांगतात तेव्हा कोणती माहिती देण्यापूर्वी कॉलर वैद्य आहे किंवा कॉल योग्य हेतूने केला आहे का याची खात्री करा.
- पेमेंटची सुरक्षित पद्धत तुम्ही याआधी कंपनीला इतर पद्धतींद्वारे पैसे दिले असल्यास, तीच पद्धत वापरण्यास सांगा.
- आपण खरेदी केलेल्या किंवा व्यवहाराच्या संदर्भात प्रतिनिधीला विचारणा केली पाहिजे आणि खरेदी केलेली पावती किंवा पेमेंटची पावती जपून जतन करून ठेवली पाहिजे.
- तुमच्या कार्डवर केलेला व्यवहार पावतीशी जुळतो की नाही ते तपासा.ते तुमच्या बँकिंग अॅपवर तपासा, स्टेटमेंट येण्याची वाट पाहू नका.