Close Visit Mhshetkari

7th pay Allowance Arrears : मोठी बातमी ! या कर्मचाऱ्यांना मिळणार १ महिन्याचे परिश्रम अनुदान ; शासन निर्णय निर्गमित ….

7th pay Allowance Arrears : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून आता खालील संवर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे आगाव वेतन सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने मिळणार आहे.

सदरील आगाऊ भत्त्यास ” परिश्रमिक मानधन ” असे संबोधण्यात येणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर

7th Pay Parishram Allowance

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका -२०१९ च्या कामकाजाकरीता ३० दिवस अथवा ३० दिवसांपेक्षा जास्त पूर्णवेळ प्रत्यक्ष नियुक्त केलेल्या पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार एक महिन्याच्या मुळ वेतनाएवढी रक्कम पारिश्रमिक मानधन देण्याबाबत दिनांक ०५ एप्रिल, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित करण्यात आलेले आहे.

कर्मचारी घटक प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार बहुतांशी पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे एक महिन्याचे मुळ वेतन म्हणून पारिश्रमिक मानधन अदा करण्यात आले आहे.

आता देय होत असलेल्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मुळ वेतनाच्या फरकाची रक्कम रुपये ४५,४३.९२९/- (अक्षरी रुपये पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार नऊशे एकोणतीस फक्त) इतक्या खर्चास मान्यता देण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

हे पण वाचा ~  7th pay commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी... पगार वाढू शकतो 44% पेक्षा जास्त

पारिश्रमिक मानधन अनुदान

सदर मानधन हे एका अधिका-यास / कर्मचा-यास एकदाच देय होईल, तसेच, सदर अधिकारी व कर्मचारी यांना फरकाची रक्कम अदा करताना दुबार रक्कम अदा होणार नाही, याची विभाग प्रमुखांना दक्षता घ्यावी लागणार आहे.

पोलीस महासंचालक यांच्या अखत्यारीतील घटक कार्यालयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पारिश्रमिक/मानधन यावर होणारा खर्च (१) “मागणी क्र.बी-१, २०५५ पोलीस, (००) १०९ जिल्हा पोलीस, (००) (०१) जिल्हा पोलीस बल, दत्तमत (२०५५ ०१६८) (०१) वेतन” या लेखाशिर्षाखाली सन २०२३-२०२४ या वित्तिय वर्षातील उपलब्ध अनुदानातून भागविण्यात येणार आहेत.

सररील शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.७०/२०२४/व्यय-७, दिनांक १६.०२.२०२४ अन्वये त्या विभागांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment