Close Visit Mhshetkari

Best SIP : वर्ष २०२३ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हे आहेत आघाडीचे म्युच्युअल फंड! 

Best SIP : ईटी म्युच्युअल फंड्सने पाच विविध इक्विटी म्युच्युअल फंड श्रेणींमधून दोन योजना विश्लेषणासाठी निवडल्या आहेत. हायब्रिड, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि फ्लेक्सी कॅप गटातील योजना नियमित म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत.

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मधील गुंतवणूक साधारणपणे शेअर बाजारापेक्षा कमी जोखमीची असते. देशात एसआयपीकडे लोकांचा कल दिवसागणिक वाढत चालला आहे. म्युच्युअल फंड विशेषतः इक्विटी म्युच्युअल फंड समानार्थी बनले आहेत. सदरील योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना नियमितपणे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एक निश्चित रक्कम गुंतवावी लागते.

Mutual Funds for Investment

गुंतवणूकदारांसाठी एसआयपी गुंतवणूक खूप फायदेशीर ठरली आहे.इक्विटी म्युच्युअल फंड योजना २०-३० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देत आहेत. गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी इक्विटी योजनांच्या दीर्घकालीन कामगिरीचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे.

सर्वप्रथम आपण स्मॉल कॅप म्युच्युअल फंड यांनी मागील काळामध्ये सर्वोत्तम रिटर्न दिले आहेत,यांची माहिती बघणार आहोत. यामध्ये जवळपास 30% रिटर्न दिलेले काही फंड आहेत.

हे पण वाचा ~  Sip Calculator : कमीत कमी पगारात लखपती बनण्याचा सिक्रेट फॉर्म्युला! SIP मध्ये करत असाल गुंतवणूक तर पहा

Small Cap Mutual fund

SBI Small Cap Fund : या योजनेतून गुंतवणूकदारांना पाच वर्षांत २०.०८ % वार्षिक परतावा मिळाला. 

Quant Small Cap Fund : गेल्या पाच वर्षांत या डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना २९.११ % वार्षिक परतावा मिळाला आहे.

Axis Small Cap Fund : पाच वर्षांत या डायरेक्ट प्लॅनमधून वर्षाला २३.८२ % परतावा मिळाला आहे.

ICICI Prudential Smal Cap Fund : या स्कीमच्या डायरेक्ट प्लॅनमधून पाच वर्षांत २१.६४ % वार्षिक परतावा मिळाला आहे.

Kotak Small Cap Fund : या योजनेच्या थेट गुंतवणुकीतून पाच वर्षांत २२.४८ % वार्षिक परतावा मिळाला आहे.

Nippon India Small Cap Fund : यातून गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांत वर्षाला २२.९६ % परतावा मिळाला.

एस.आय.पी मध्ये 5 हजार रुपये गुंतवणूक करून किती परतावा मिळेल येथे पहा 👉 SIP Calculator

1 thought on “Best SIP : वर्ष २०२३ मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हे आहेत आघाडीचे म्युच्युअल फंड! ”

Leave a Comment