Close Visit Mhshetkari

Kinetic e-Luna : आता भारतात आली ईलेक्ट्रिक कायनेटिक लूना! फक्त 500 रुपयांत पासून बुकींग सुरू …

Kinetic e-Luna : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून ई लुना बुकिंग सुरू होणार आहे.

विशेष म्हणजे ग्राहकांना केवळ 500 रुपये देऊन ही ई-लूना बुक करता येईल. कायनेटिकचा पहिला लूक पण प्रजासत्ताक दिनी सर्वांसमोर आला आहे.

आता कंपनीने kinetic Green च्या बॅनरखाली ई-लूना लाँच करण्याची तयारी केली आहे.थोडक्यात लूना पुन्हा एकदा भारतीय रस्त्यावर धावताना दिसणार आहे. मित्रांनो kinetic Luna ही अनेकांची पहिली क्रश होती. शहरीच नाही तर ग्रामीण भागात पण हा फिरण्याचा एक स्वस्त पर्याय होता. 

Electric Luna – kinetic Green

महाराष्ट्रातील अहमदनगरमधील प्लँटमध्ये ई-लूना तयार करणार आहे.कायनेटिक कंपनीनुसार या प्लँटमध्ये दर महिन्याला 5000 ई-लूना तयार करणार आहे.कायनेटिकने देशभरात लूनाचे 5 लाख यूनिट विक्री केली होती.

नवीन लुनाची रचना जवळपास जुन्या मॉडेलसारखीच दिसेल.टीझर इमेज गोल हॅलोजन हेडलाइट, हेडलाइट काउल आणि हॅलोजन इंडिकेटरसह समोरची रचना दर्शवते.Kinetic त्याची किंमत सुमारे 80,000 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्याची शक्यता आहे.

Kinetic electric Luna features 

सदरील लूनामध्ये एक छोटासा बॅटरी पॅक मिळेल जो प्रति चार्ज सुमारे 100 km ची रेंज देणार आहे. याव्यतिरिक्त, हे Ather 450X आणि Ola S1 Pro सारखे हाय-स्पीड EV असू शकत नाही.त्यामुळे, त्याचा टॉप स्पीड सुमारे 50 ते 60 KM प्रतितास असेल असा अंदाज आहे.

हे पण वाचा ~  Electric Bike : सिंगल चार्ज मध्ये 150 KM वाली गोगोरोची नवीन इलेक्ट्रिक बाईक; शहर आणि ग्रामीण भागात किफायतशीर पर्याय?

जुन्या लुनाप्रमाणेच आगामी ईव्हीची रचना ग्रामीण बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. स्कूटरची प्री-बुकिंग आधीच फक्त 500 रुपयांमध्ये खुली आहे.अधिकृत बुकिंग 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे. लॉन्चची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु ती फेब्रुवारीच्या सुरुवातीला लॉन्च होईल.

2000 रुपयांत झाली होती सुरुवात

आपणस माहित असेल की,कायनेटिकने 1970-80 च्या दशकात लूनाला केवळ 2000 रुपयांच्या किंमतीत बाजारात उतरवले होते. सदरील लूनाने 28 वर्षांपर्यंत मोपेड सेगमेंटमध्ये अधिराज्य गाजवले होते.बाजारात या मोपेडचा जवळपास 95 % वाटा होता.

सन 2000 मध्ये बाजारात दूचाकीत अनेक नवनवीन प्रयोग होऊन नवीन बाईक बाजारात आल्या,त्यातच ग्राहकांना खरेदीसाठी अनेक पर्याय मिळाल्याने लूनाचे उत्पादन थांबवावे लागले होते.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment