Education policy : केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ. ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो.
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजना
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार इ.१ ली ते इ.५ वीच्या विद्याथ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच, इ. ६ वी ते इ.८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक द २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते. सद्यस्थितीत प्रस्तुत योजनेतर्गत तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाग विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
१. प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतर्गत सन २०२३-२४ था शैक्षणिक वर्षामध्ये योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहारासोबत पौष्टीक पदार्थ देण्याकरिता अंडी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
२. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील सर्व योजनेस पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत देण्यात येत असलेल्या नियमित आहाराव्यतिरिक्त २३ आठवड्याकरीता आठवड्यातून एक दिवस अंडी देण्यात येईल
३. दि. २० डिसेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार महिन्याच्या सुरुवातीस शाळांना अग्रीम स्वरुपात अनुदान देणे आवश्यक असलयाने, याकरीता माहे जानेवारी, २०२४ मधील पाच आठवड्यांकरीता प्रति विद्यार्थी प्रति आठवडा एका अंड्यासाठी रु.५/- इतका निधी अग्रीम स्वरुपात जिल्ह्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
४. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करुन आठवड्यातील बुधवार किवा शुक्रवार या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अडे किवा अंडा पुलाव / अंडा बिर्याणी या स्वरुपात सदर पदार्थाचा लाभ देणेत यावा.
५. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत अथवा अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना सदर दिवशी नियमित आहारासोबत रु.५/- किंवा मुद्दा क्रमांक ३ अन्वये निर्धारित होणार दर या मर्यादेत केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करुन देण्यात येईल.
६. प्रस्तुत उपक्रमाची अंमलबजावणी योजनेस पात्र सर्व शाळांमधून नियमितपणे होईल, याची दक्षता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी घ्यावयाची आहे.
शालेय पोषण आहार योजना
७.वितरीत करण्याकरीता आवश्यक अनुदानाची गागणी संचालनालयाकडे नोंदविण्यात यावी. तरनंतर सदर निधीचा शाळांनी केलेला विनियोग, उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी तसेच, केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधी विचारात घेवून पुढील टप्यातील निधी शाळांना उपलब्ध करुन देण्यात येईल.
८.अन्न शिजविणाऱ्या यंत्रणामार्फत बुधवार अथवा शुक्रवार या दिवशी उकडलेली अंडी / अंडा पुलाव / अंडा बिर्याणी या स्वरुपात लाग देण्यात यावा, तसेच, जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना नियमित आहारासोबत अतिरिक्त पुरक आहार म्हणून केळी देण्यात येईल.