Close Visit Mhshetkari

PRAN Card Download : एनपीएस धारकांचे प्राण कार्ड म्हणजे काय ? आपले कार्ड कसे डाउनलोड करावे; पहा सविस्तर माहिती ..

PRAN Card Download : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारने 2005 नंतर सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच खाजगी नोकरदारांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीएस लागू केलेली आहे.

सदरील योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमधून 10% रक्कम तर सरकार सुद्धा आपला 14% रक्कम एन पी एस खात्यात जमा करते.

PRAN म्हणजे काय?

आपला एमपीएस खात्यात जमा होणारे रक्कम त्याचा तपशील सर्व माहिती ठेवली जाते. राष्ट्रीय पेन्शन योजनेत समाविष्ट झाल्यानंतर आपल्याला एक कायमस्वरूपी 12 अंकी क्रमांक देण्यात येतो. एक प्राण कार्ड सुद्धा आपल्याला देण्यात येते. तर हे प्राण कार्ड म्हणजे काय? ते कसे मिळवायचे अर्ज कसा करायचा? या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर म्हणजे PRAN होय. हा एक अनन्य साधारण 12-अंकी क्रमांक असतो,जो प्रत्येक NPS सदस्याला दिला जातो.एका व्यक्तीचा एका वेळी फक्त एक PRAN असू शकतो. 

सदरील क्रमांक ग्राहकाच्या आयुष्यभर सक्रिय राहतो आणि भारतातील कोणत्याही ठिकाणाहून प्रवेश करता येतो.प्रत्येक NPS ग्राहकाने अनिवार्यपणे PRAN धारण करणे आवश्यक आहे.

PRAN साठी अर्ज कसा करावा?

व्यक्ती PRAN कार्डसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतात.

ऑफलाइन पद्धतीमध्ये,व्यक्तींना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) अंतर्गत पॅनेल केलेल्या PoP किंवा पॉइंट ऑफ प्रेझेन्सला भेट देणे आवश्यक आहे.पेन्शन नियामक निधी आणि विकास प्राधिकरण (PRFDA) कडे सदस्यांची घोषणा PRAN अर्ज भरल्यानंतर, अर्जदाराने तो संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक आहे. 

हे पण वाचा ~  NPS Partial Withdrawal : आपल्याला NPS खात्यातील पैसे काढता येतात का? नियम काय आहेत; पहा पात्रता,मर्यादा सविस्तर माहिती...

PAN द्वारे PRAN कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदाराचे KYC पडताळणीसाठी पॅनेल केलेल्या बँकेत बँक खाते असणे आवश्यक आहे.नोंदणी प्रक्रियेदरम्यान असा अर्जदार जी बँक निवडेल ती केवायसी पडताळणी करेल. CRA कडे नोंदणी फॉर्म मुद्रित करून कुरियर करण्याचा किंवा ई-साइन करण्याचा पर्याय आहे.

आधार कार्ड वापरून PRAN कार्ड अर्ज करण्यासाठी केवायसी पडताळणी ओटीपीद्वारे केली जाते. हा ओटीपी आधार डेटाबेसमध्ये नोंदणीकृत आणि रेकॉर्ड केलेल्या मोबाइल नंबरवर पाठवला जातो.

PRAN कार्ड आवश्यक कागदपत्रे

  • पॅन 
  • आधार कार्ड
  • रद्द केलेल्या चेकची स्कॅन केलेली प्रत
  • स्कॅन केलेली स्वाक्षरी
  • स्कॅन केलेला फोटो
  • स्कॅन केलेला पासपोर्ट – एनआरआय अर्जदारांसाठी तो अनिवार्य आहे.
e-PRAN कशी प्रिंट करायची ?

अर्जदार e-PRAN प्रिंट सुध्दा डाऊनलोड करू शकतात.अर्जदारांनी त्यांच्या NPS खात्यात लॉग इन करून “Print e-PRAN” पर्याय निवडावा लागेल.त्यांच्या मोबाईल फोनवर डिजीटल प्रत ठेवण्यासाठी ई-प्राण कार्ड डाऊनलोड करा.

आपले Pran Card येथे डाऊनलोड करा 

PRAN card download

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment