Mandhan wadh : नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात घेण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्या संदर्भात महत्त्वाच्या तीन शासन निर्णयाची बातमी बघणार आहोत.ज्यामध्ये कंत्राटी कर्मचारी असेल किंवा पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका असेल यांच्या मानधना सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे.
पोलीस पाटलांना १५ हजार रुपये महिना
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की पोलीस पाटील हे गावातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचे पद समजले जाते. बुधवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता पोलीस पाटलांना महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यापूर्वी त्यांना महिन्याला ६ हजार ५०० रुपये मानधन दिले जाते.
आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ
महाराष्ट्र राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या ५ हजार रुपयांची वाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदरील मानधन मधील वाढ ही नोव्हेंबर, २०२३ या महिन्यापासून देण्यात येईल.
२०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त २००.२१ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय… pic.twitter.com/bUqZNCD7lC
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 13, 2024
कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील तिसरा महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे,राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना मंजूर समक्ष पदावर सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.सदरील निर्णयानुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे.