Close Visit Mhshetkari

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA वाढीनंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ ! पहा सविस्तर ..

7th Pay Commission : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे.सरकारने आता रिटायरमेंट नंतर मिळणाऱ्या रिटायरमेंट ग्रॅच्युइटी (Retirement Gratuity) आणि डेथ ग्रॅच्युइटीची (Death Gratuity) मर्यादा 25 टक्क्यांनी वाढवली आहे. आता सदरील मर्यादा 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये केली आहे.

7th Pay Commission update

सदरील वाढ एक जानेवारी 2024 पासून लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने नुकतेच लोकसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी डीए मध्ये वाढ केली होती आपल्याला माहिती असेल की महागाई भत्ता चार टक्के वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना 46 % दराने मिळणारा महागाई भत्ता 50 % झाला आहे.

आता रिटायरमेंट ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटीसह अन्य भत्त्यांमध्ये वाढ अपेक्षित होते. डीए वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट ग्रॅच्युइटीसह अनेक भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे.

Retirement Death Gratuity Hike

मित्रांनो एक जानेवारी 2024 नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदरील वाढीव ग्रॅज्युएटीचा फायदा मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4% वाढ करण्यात आली होती. त्यानंतर DA 50 टक्क्यांपर्यंत वाढला होता.

हे पण वाचा ~  7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार तीन मोठे गिफ्ट! पगारात होणार 8 हजाराची वाढ ?

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की ग्रॅज्युटी वाढी संदर्भातील घोषणा 30 एप्रिल रोजी करण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या काळात सात मेईपर्यंत सदरील घोषणा थांबवण्यात आली होती. पेमेंट ऑफ ग्रॅच्युईटी अॅक्ट १९७२ नुसार एखाद्या कर्मचाऱ्यानं एखाद्या संस्थेत किमान पाच वर्षे सलग काम केलं असेल तर त्याला ग्रॅच्युईटीचा लाभ मिळेल.

मार्च महिन्यात झाली महागाई भत्त्यात वाढ

केंद्र सरकारने मार्च महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 % वाढ केली होती. सध्या 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना अजून पर्यंत सदरील महागाई भत्ता वाढ मिळालेली नाही. दि 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागल्यानंतर, आता 6 जूनला नवीन लोकसभा स्थापित झाल्यानंतर आचारसहिता संपणार आहे. त्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे.

Leave a Comment