Close Visit Mhshetkari

Anukampa Niyukti : मोठी बातमी ! अनुकंपा नियुक्ती संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित ; आता असा करावा लागणार बदल …..

Anukampa Niyukti : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहित आहे की,माजी सैनिकांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने युद्ध विधवांची मुले, युद्ध विधवा, युद्धात अपंग झालेले सैनिक, इतर अपंग सैनिक,माजी सैनिकांच्या विधवा,माजी सैनिकांचे पाल्य,इत्यादीना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दि. १७/०७/२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे.

Anukampa Niyukti for exercise Mens

शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे या व अशा शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये,माजी सैनिकांच्या त्यांच्यावर अवलंबून असणा-या कुटुंबातील पात्र व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेस्को महामंडळाकडून सेवा घेण्यास प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. 

दि. १७/०७/२०१९ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी होणेसाठी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयाकडून अधिकाधिक आस्थापना, महामंडळे यामध्ये माजी सैनिकांच्या/अवलंबितांच्या रोजगारासाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मेस्को महामंडळाकडून सेवा घेण्यास प्रोत्साहित करण्याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करावी असे निर्देशित करण्यात आले आहे.

हे पण वाचा ~  Good news : खुशखबर... 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार 3 वर्षाच्या आगाऊ वेतनवाढी! सुधारित वेतनश्रेणीत वेतन निश्चिती होणार

सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहे.सदरील परिपत्रक उर्मिला सावंत अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांच्याकडून काढण्यात आले आहे.

This article has been written by Raj Kakad from Maharashtra.He is a famous Marathi Blogger, Website Developer and Administrator of MahEmployees.com

Leave a Comment