Close Visit Mhshetkari

EPFO Rules : पगारातून कपात झालेले पैसे आपल्या पीएफ खात्यात जमा न झाल्यास 15 दिवसात करता येते तक्रार! पहा सविस्तर

EPFO Rules : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की खाजगी कंपनीमध्ये काम करताना किंवा सरकारी कंपनीमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी म्हणजे ईपीएफ साठी कर्मचाऱ्यांच्या पगारांमधून दरमहा पैसे कपात केले जातात आणि ते पीएफ खात्यात जमा होतात सरकारने 2022-23 सालासाठी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरामध्ये 8.15% व्याजदर मंजूर करून घवघवीत वाढ केलेली आहे. 

मित्रांनो आपल्या पगारातून जर आपले पीएफ साठी पैसे कपात होत असेल आणि कंपनी ती आपल्या पीएफ खात्यात जमा किंवा वर्ग करत नसतील तर अशा वेळेस आपण कंपनीच्या विरोधात तक्रार करू शकतो या संदर्भातील सर्व सविस्तर प्रोसेस आपण या आजच्या लेखांमध्ये बघणार आहोत.

15 दिवसांत पीएफ योगदान जमा करणे आवश्यक

आता कंपनीमधील कर्मचाऱ्यांना आपल्या एपीएफ मधील पैसे जमा झाले की नाही हे एपीएफ पोर्टलवर लॉगिन करून पाहता येतात आता कंपनीने मागील महिन्यामध्ये पैसे जमा केलेले आपल्या खात्यात वर्ग झाले की नाही हे बघितल्यानंतर जर पैसे जमा झाले नसेल तर पंधरा दिवसाच्या आत ईपीएफ योगदान जमा करणे आवश्यक असते.

आपण कंपनीच्या विरोधात ऑनलाईन तक्रार करू शकतो.आपण जर पैसे वेळेवर जमा केले नाही तर आपल्याला अतिरिक्त शुल्क भरावे लागते त्यामुळे ही कंपनीची जबाबदारी असते.

कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर नियमक संस्था कंपनीविरुद्ध चौकशी करते तपासात जर असे काही आढळून आल्यास ईपीएफ चे पैसे कापले गेले आहेत परंतु जमा केलेले नाहीत तर कार्त्या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करणे केल्या जाते हिपको अधिकारी किंवा एपीएफ कपातीच्या उशिरा थेवर व्याज देखील आकरू शकतात आणि पैसा परत पाठवण्याची कारवाई सुद्धा या संस्थेमार्फत करण्याचे आदेश देण्यात येऊ शकतात

हे पण वाचा ~  EPFO Pension : ईपीएफओचा हा बदल तुमच्या पथ्यावर, पहा सविस्तर महिती

EPF new rules 2023

जर एखाद्या कंपनीने सर खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पीएफचे पैसे दोन महिने जमा केले नसेल तर त्यांना वार्षिक पाच टक्के दराने थकबाकी भरावी लागते तसेच जर एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्यांचे पीएफ मधील पैसे दोन महिन्यापेक्षा जास्त परंतु चार महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी जमा केले नसेल तर त्यांना वार्षिक दहा टक्के रुपये दराने थकबाकी भरावी लागत असते. 

आणि कंपनीने जर चार जण ते सहा महिन्यापर्यंत पीएफचे पेमेंट जमा करण्याची चूक केली तर तिला वार्षिक 15 टक्के दराने सुद्धा थकबाकी भरावी लागते ज्या कंपनीने सहा महिन्यापेक्षा जास्त काळ एक जमा करत नाहीत त्यांना 25 टक्के पर्यंत सुद्धा रक्कम व्याजासह परत करण्याची किंवा पीएफ खात्यात भरण्याची सजा नियमक संस्था देऊ शकते.

ऑनलाइन कसा चेक कराल बॅलन्स?

EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही रक्कम पाहू शकता. यासाठी तुम्हाला फक्त Universal Account Number (UAN) देणे गरजेचे असते. UAN क्रमांक हा 12 आकड्यांचा क्रमांक असतो.UAN क्रमांक टाईप केल्यानंतर सुरु होणाऱ्या विंडोवर तुम्हाला “For Employees”वर क्लिक करावे लागेल.येथे तुम्ही “Member Passbook” या पर्यायावर क्लिक करा.

PF balance check number

तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून फक्त 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. रिंग वाजल्यानंतर फोन आपोआप कट होईल, काही वेळाने तुम्हाला EPF मधील शिल्लक रक्कम व तुमच्या खात्याशी संबंधित इतर माहिती संदेशच्या रूपात मिळेल.

1 thought on “EPFO Rules : पगारातून कपात झालेले पैसे आपल्या पीएफ खात्यात जमा न झाल्यास 15 दिवसात करता येते तक्रार! पहा सविस्तर”

Leave a Comment