Close Visit Mhshetkari

Old age Pension : मोठी बातमी जुनी पेन्शन अभ्यास समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ ! शासन निर्णय निर्गमित ..

Old age Pension : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की मार्च 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन पुकारले होते.

आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर दिनांक १४.०३.२०२३ अन्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

जुनी पेन्शन योजना अभ्यास समिती मुदतवाढ

दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस/अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से.अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

सदर समितीने 3 महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीचे सांख्यिकीय, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करुन शासनास परिपूर्ण शिफारस/ अहवाल सादर करण्यासाठी समितीस वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक २७.०७.२०२३ अन्वये दोन महिन्यांसाठी दि. १४.०८.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

हे पण वाचा ~  खुशखबर.. आणखी एका राज्यात जुनी पेन्शन योजना लागू! 1 एप्रिल पासून NPS बंद; old pension news

Old pension Commitee

सद्य:स्थितीमध्ये समितीचे अहवाल तयार करण्याचे कामकाज अंतरिम टप्प्यावर असून अंतिम परिपूर्ण अहवाल सादर करण्याकरिता समितीस दिनांक १५.११.२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

Leave a Comment