Close Visit Mhshetkari

PAN Card हरवलेय, खराब झाले ? टेन्शन नको, आजच डाऊनलोड करा e-PAN, सोपी आहे प्रोसेस..

PAN Card : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की पॅन कार्ड हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक असून पॅन कार्ड शिवाय कोणत्याही कामाला मुहूर्त लागत नाही.अशावेळी सरकारी कामांसाठी पॅन कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो.

E-pan Online download

तुम्ही आता डिजिटल पॅन कार्डही वापरू शकता आणि तुम्ही स्मार्टफोनमध्येही ते सेव्ह करू शकता. यालाच ई-पॅन असे म्हणतात. इलेक्ट्रॉनिक व्हर्जन पॅनकार्ड आयकर विभागाच्या UTIITSL किंवा NSDL वेबसाइटवरून डाउनलोड केरता येते.

ई-पॅन कार्ड वेब साईटद्वारे डाऊनलोड करण्याची पद्धत अतिशय सोपी असते.यासाठी आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक असते.पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आयकर ई-फायलिंग वेबसाइट वर जावे लागते.सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.

पॅनकार्ड असे करा डाऊनलोड

  • आयकर विभागाच्या होमपेजवर गेल्यानंतर Instant E-PAN वर क्लिक करावे.
  • याठिकाणी Check Status/ Download PAN च्या खाली दिलेल्या Continue वर क्लिक करावे.
  • आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
  • खाली दिलेल्या चेकबॉक्सवर मार्क करा आणि नंतर Continue वर क्लिक करा.
  • याठिकाणी तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येतो.
  • OTP टाकल्याव Continue वर क्लिक करा.
  • आता दुसरी स्क्रीन दिसेल ज्यामध्ये View E-PAN आणि Download E-PAN हे पर्याय दिसतील यामधून Download E-PAN चा पर्यायावर क्लिक करा.
  • Save the PDF file वर क्लिक केल्यानंतर तुमचे ई-पॅन डाउनलोड होईल.
हे पण वाचा ~  Pan Card : मोठी बातमी ... पॅनधारकांना दहा हजारांचा दंड; पॅन वापरताना घ्या काळजी !

आपली डाऊनलोड झालेली PDF फाइल पासवर्ड प्रोटेक्टेड असते त्याचा पासवर्ड आपली जन्मतारीख DDMMYYYY फॉरमॅटमध्ये टाकावी लागेल.

आपले ई- पॅन कार्ड येथे डाऊनलोड करा

E-Pan Download

2 thoughts on “PAN Card हरवलेय, खराब झाले ? टेन्शन नको, आजच डाऊनलोड करा e-PAN, सोपी आहे प्रोसेस..”

  1. माझे पॅन कार्ड मिळणेस विंनती असे.

    Reply

Leave a Comment