Close Visit Mhshetkari

HDFC update : एचडीएफसी बँकेचे विलिनीकरण का होत आहे ?घ्या जाणून माहिती

HDFC Bank update: नमस्कार आपले आमच्या  वेबसईट्सवर स्वागत आहे. एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला  दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय मंडळाने या विलीनीकरणाला मंजुरी दिली असून एचडीएफसीच्या प्रत्येक समभागधारकाला त्याच्याकडील 25 समभागांच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे 42 समभाग मिळतील. भारताच्या कॉर्पोरेटविश्वामधला हा एक अतिशय मोठा व्यवहार ठरला आहे.

HDFC Bank Merger

देशातील सर्वात मोठी हाऊसिंग कंपनी एचडीएफसी  आणि एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच 1 जुलैपासून विलिनीकरण होणार आहे, अशी माहिती एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी दिली होती. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी फायनान्स एचडीएफसी बँकेचाच एक भाग बनेल. विलिनीकरणासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, काल (30 जून) बाजार बंद झाल्यानंतर एचडीएफसी बोर्डाची या प्रक्रियेसाठीची अखेरची बैठक पडली. या विलीनीकरणाच्या प्रक्रियेनंतर एचडीएफसी बँक जगातील सर्वात व्हॅल्यूएबल बँकांच्या यादीत सामील झाली आहे. आता बँक जगातील चौथी व्हॅल्यूएबल बँक बनणार आहे. 

एचडीएफसी बँक विलीनीकरण का होत आहे?

एचडीएफसी-एचडीएफसी बँक या विलीनीकरणाद्वारे स्वतःला आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत असून यामुळे एचडीएफसी बँकेच्या असुरक्षित कर्जाचा धोका आणखी कमी होईल. या विलीनीकरणानंतर लोकांना गृहकर्जापासून ते इतर बँकिंग सेवांपर्यंत सर्व काही एकाच छताखाली मिळणार आहे. या विलीनीकरणाबाबत एचडीएफसीचे उपाध्यक्ष केकी मिस्त्री यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हे विलीनीकरण दोघांच्या भल्यासाठी होत आहे. ने फक्त हाऊसिंग लोनचा व्यवसाय करावा आणि बाकीचा व्यवसाय  बँकेचा असावा, हे फार काळ चालणार नाही. अशा परिस्थितीत विलीनीकरणासाठी ही वेळ अत्यंत योग्य आहे.

हे पण वाचा ~  HDFC Bank Interest : आरबीआय कडून नवीन व्याजदर जाहीर! पहा आपला कितीने वाढणार हप्ता?

विलीनीकरणाचा ग्राहकांवर काय परिणाम होईल

या विलीनीकरणाचा लाभ बँक खातेदारांना मिळेल. बँक खातेदारांना एकाच छताखाली बँकिंग आणि फायनान्स या दोन्हींचा लाभ मिळणार असून  उत्पादने आणि सेवा  बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असतील. एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेचे हे विलीनीकरण कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठे विलीनीकरण आहे. या विलीनीकरणानंतर, बँकेचे मूल्य १६८ अब्ज होईल. या विलीनीकरणामुळे एचडीएफसी समूहाच्या विमा कंपन्या आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या वगळून बँकेचे कोट्यवधी खातेदार, एचडीएफसीकडून कर्ज घेणारे कर्जदार यांच्यावर परिणाम होईल, 

ठेवींची वाढ

HDFC बँकेने ठेवी आकर्षित करण्यात सातत्याने आपल्या समवयस्कांना मागे टाकले आहे आणि विलीनीकरणाने गहाण कर्जदाराच्या विद्यमान ग्राहक पूलमध्ये टॅप करून ठेवींचा आधार वाढवण्याची आणखी एक संधी दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापैकी 70% ग्राहकांची सध्या बँकेत खाती नाही. एचडीएफसी बँकेचे रिटेल हेड अरविंद कपिल यांनी अलीकडेच या ग्राहकांना बचत खाती उघडण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या त्यांच्या योजना शेअर केल्या, ज्यामुळे त्यांच्याशी बँकेचे नाते अधिक घट्ट होईल.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment