ops committee updates : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप पुकारला होता.होते.आज त्या जुनी पेन्शन मागणीसाठी राज्यातील तीन प्रमुख संघटना राजपत्रित अधिकारी महासंघ सकाळी 11 ते 12, राज्य मध्यवर्ती संघटना दुपारी 12 ते 1 आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना 1 ते 2 दरम्यान जुनी पेन्शन मागणी साठी प्रस्ताव सादर केला आहे.
जुनी पेन्शन योजना अपडेट्स
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाच्या वतीने जुन्या पेन्शनसाठी गठित अभ्याससमिती समोर संघटनेची जुन्या पेन्शनची मागणी तसेच मंत्रालय भेटी व चर्चेविषयी सविस्तर माहिती समोर आली आहे.
जुन्या पेन्शनसाठी गठित अभ्यास समितीच्या सचिव साहेबांनी जुनी पेन्शन संघटनेच्या सरचिटणीस श्री.गोविंद उगले यांना केलेल्या भ्रमणध्वनी सुचने नुसार संघटनेच्या वतीने अभ्यास समिती समक्ष राज्याध्यक्ष श्री.वितेश खांडेकर व राज्य सल्लागार श्री.सुनिल दुधे यांनी भूमिका मांडणी व प्रस्ताव सादर केला.
Old pension committee news
सदर अभ्यास समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष श्री.सुबोध कुमार साहेब, श्री. के.पी.बक्षी साहेब, श्री.वैभव राजेघाटगे साहेब (सचिव) तसेच VC द्वारे श्री.सुधीरकुमार श्रीवास्तव साहेब यांच्या उपस्थितीत दुपारी 1.00 वाजता स्वतंत्र बैठक आणि भूमिका मांडण्याची संघटनेला संधी देण्यात आली.अभ्यास समितीसोबत सुमारे एक ते सव्वा तास संघटनेची भूमिका व प्रस्ताव यावर चर्चा झाली.
जुनी पेन्शन योजनेसंदर्भात संघटनेचा प्रस्ताव
1. NPS योजनेतून महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजने प्रमाणे लाभ देणे किंवा मिळणे अशक्य आहे.
2. राज्यात NPS व DCPS योजनेच्या धोरण व अंमबजावणी मधील प्रचंड अनियमितता मुळे सदर DCPS व NPS योजनेतील कपातीवर आधारित खात्रीशीर पेन्शन देणे शक्य नाही.
3. त्यामुळे जुनी निवृत्तीवेतन योजना हीच सुरक्षित व न्यायिक पर्याय असल्याने 1982 व 84 ची जुनी पेन्शन लागू करण्यात यावी.
4. पेन्शन देण्यासाठी शासनाने वेगळा फंड व निधी निर्माण करावा.
5. 14% शासनवाटा याचे योग्य व्यवस्थापन केल्यास आणि काही अतिरिक्त भार शासनाने स्वीकारल्यास जुनी पेन्शन देणे शक्य आहे.
6. निवृत्तीवेतनसाठी शासनाला मोठ्या प्रमाणात येणारा आर्थिक बोझा हे आभासी असून नवीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिल्यास शासनाला अल्प अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
7. अन्य पाच राज्यात जुनी पेन्शन कशी लागू केली त्याचे दाखले व चर्चा.
Ops news Maharashtra
या सर्व मुद्दयांवर समितीकडून सविस्तर सादरीकरण करण्यात आले.अभ्यास समितीला संघटनेच्या अनेक मुद्दे हे प्रभावी वाटले. त्यामुळे स्वतः समिती अध्यक्ष श्री.सुबोध कुमार साहेब,श्री.बक्षी साहेब आणि सचिव राजेघाटके साहेब यांनी पुन्हा विस्तृत माहितीसह समितीच्या पुढील बैठकीत संघटनेला आमंत्रित केले आहे.
जुनी पेन्शन संदर्भात मंत्रालयीन अपडेट्स येथे पहा