Retirement age : नमस्कार मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे.बऱ्याच दिवसापासून सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीवर 58 वर्षा वरून 60 वर्ष करण्यासाठी प्रयत्न आहेत.आता या संदर्भात नवीन माहिती समोर आलेली आहे.
सेवानिवृत्ती वय 60 वर्ष होणार?
मित्रांनो महाराष्ट्र राज्य राजपात्रित अधिकारी महासंघाचे संघाची नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पाडलेली पडली आहे.सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 60 वर्षे करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सांगितले आहे.
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्ती वय 60 वर्षे आहे महाराष्ट्र राज्याने सुद्धा असा निर्णय घ्यावा यासाठी राजपत्रित अधिकारी महासंघ बरोबरच महाराष्ट्र राज्यातील सर्वच कर्मचारी संघटना आग्रही आहे. यासंदर्भात नुकतीच महाराष्ट्र राज्य राजपात्रित अधिकारी संघाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये हा मुद्दा चर्चेला गेला असून सरकार लवकरच येत्या काळात राज्य सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.
Employees Retirement age
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी व राजपात्रित अधिकारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर ग्रॅच्युईटी रक्कम सेवानिवृत्ती वय 60 वर्ष अशा अनेक मुद्यासंदर्भात आंदोलनाच्या तयारीत आहे.याच आंदोलनाचा भाग म्हणून १४ डिसेंबर रोजी महासंघाने एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन पुकारलं होते.
सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. सदरिल बैठकीत जुनी पेन्शन आणि कर्मचाऱ्यांच्या निवृतीवय ६० वर्ष संदर्भात चर्चा होणार आहे. वयाची बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं संघटनेने स्पष्ट केले आहे. महासंघाचे संस्थापक ग.दि. कुलथे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
निवृत्तीचे वय ६० वर्षांची बाब विचाराधीन असू देत, निर्णयाचे स्वागत आहे पण १४ मार्च २०२२ पासून जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्या सर्वांना अतिरिक्त दोन वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे ही कळकळीची विनंती.
महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा.
Yes
निवृत्तीचे वय 58 वरुन 60 वर्षे हा g.R कधीपासून लागू होणार
सेवा निवरत्ती वयो मर्यादा 60 वर्ष करण्याच्या ह्या निर्णयाचे कर्मचारी यांचे तर्फे सरकारचे, राजपत्रीत अधिकारी व सर्व कर्मचारी संघटनाचे स्वागत असून मा. शिंदे सरकार चांगले का कर्मचारी हितात करित आहे करिता स्वागत.