7th pay arrears bill : दिनांक १ जानेवारी २०१६ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीमध्ये जे शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, आणि यापूर्वी सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ निवृत्तिवेतनावर अंशराशीकरणाचा लाभ घेतलेला आहे.
आता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत होणाऱ्या मूळ निवृत्तिवेतनावर सुधारीत अंशराशीकरणाचा लाभ देय करण्यात आला आहे.सदर शासन पूरकपत्रान्वये सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
वाढीव निवृत्तिवेतन अंशराशीकरण लाभ मिळणार!
दि.०१.०१.२०१६ ते दि.३१.१२.२०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या ज्या निवृत्तिवेतनधारकांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ नुसार सहाव्या वेतन आयोगानुसार निश्चित होणाऱ्या निवृत्तिवेतनाप्रमाणे अंशराशीकरणाचा लाभ घेतला आहे. तथापि,शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी ज्यांचा मृत्यु झाला आहे.अशा निवृत्तिवेतनधारकांच्या कुटुंबियांना सुधारित निवृत्तिवेतनावर अंशराशीकरणाचा लाभ अनुज्ञेय राहील.
विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांना उपरोक्त कालावधीत मृत पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून प्रकरणाची योग्य ती पडताळणी / छाननी करून सदर कार्यवाही शासन पूरकपत्राच्या दिनांकापासून सहा महिन्यामध्ये पूर्ण करावी लागणार आहे.
Exra Family pension Benefits
ज्यांना कुटूंब निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे,अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषित्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये आणि कृषि विद्यापीठे यामधील निवृत्तिवेतनधारक यांना वरील पूरकपत्र योग्य त्या फेरफारांसह लागू राहील.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करुन शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहील.
सदर पूरक पत्रातील तरतुदी अखिल भारतीय सेवेतील निवृत्तिवेतनधारक / राजकीय निवृत्तिवेतनधारक / स्वातंत्र्य सैनिक निवृत्तिवेतनधारक / शौर्यपदकभत्ता निवृत्तिवेतनधारक / जखम अथवा इजा निवृत्तिवेतनधारक यांना लागू होणार नाहीत.