7th pay commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 2023 मध्ये मोठी भेट मिळू शकते. प्रत्यक्षात जुलैमध्ये सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ करू शकते,असा अंदाज आहे. यासह, फिटमेंट फॅक्टर वाढविण्याचा विचार केला जाऊ शकतो. खर तर आता पुन्हा व्या वेतन आयोगाची चर्चा चांगलीच रंगली आहे.
Government employees news
आगामी निवडणुका लक्षात घेता सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के आहे.त्याचवेळी फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्के करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. हे फिटमेंट फॅक्टर 2026 पासून लागू होऊ शकते आणि 2024 मध्ये निवडणुका होणार असल्याने 2023 च्या अखेरीस त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. याचा फायदा ५२ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये कोणतीही वाढ होणार नाही,परंतु 2024 मध्ये पुनरावलोकनानंतर ती वाढविली जाऊ शकते. मात्र, सरकारकडून याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. विभाग त्यावर विचार करेल आणि अर्थ मंत्रालयाकडे शिफारसही पाठवता येईल. दुसरीकडे नव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू आहे.
New pay commission
8 व्या वेतन आयोगादरम्यान कर्मचाऱ्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ होणार आहे.लोकसभा निवडणुकीनंतर वेतन आयोगाच्या स्थापनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.याबाबत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही आठव्या वेतन आयोगाचा उल्लेख संसदेत केला होता.आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे.वास्तविक,पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी केली जात आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो. त्या आधारे कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित केले जाते. 7 व्या वेतन आयोगानुसार पगार वाढू शकतो. यापूर्वी फिटमेंट फॅक्टर अडीच पटीने वाढला होता.
8th pay commission updates
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आले होता.1 मार्च 2016 रोजी असलेल्या मुळ पगाराला 2.57 गुणून वेतनात वाढ करण्यात आली होती.सर्वात कमी मुळ पगार 18000 रुपये करण्यात आला होता.
8 व्या वेतन आयोगामध्ये किती वाढेल पगार ?
आता 8 व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तसेच कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो.