Close Visit Mhshetkari

Income Tax वाचवण्यासाठी खोटी पावती दिली; तर गमवावी लागू शकते नोकरी! पहा काय सांगतो नियम

Income tax : सन २०२३-२४ साठी ITR दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. तुम्ही अजूनही ITR भरलेला नसल्यास, तुमच्यासाठी एक महत्वाचे सूचना आहे.

आपण काही अतिरिक्त कागदपत्रे वापरता येतात व कर बचावासाठी आवश्यक असतात.घरभाड्यांच्या पावत्यांशी, गृहकर्जांवरील अतिरिक्त दावे व देणग्यांबाबत खोटे दावे यांचा समावेश असतो.

Income tax new rules

बरेच करदाते अधिक परतावा मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरतात,पण ही हुशारी तुमच्यासाठी अडचणीचे कारण बनू शकते.असे करदाते इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहेत.आतापर्यंत करदात्यांना खोट्या पावत्या देणे सोपे होते, पण आता महसूल विभागाकडून ITR तपासण्यासाठी सॉफ्टवेअर वापरण्यात आले आहे.त्यामुळे बनावट कागदपत्रे देणाऱ्या करदात्यांना सापडणे सोपे बनले आहे.

आयटी कायद्याच्या कलम १३३(६) अंतर्गत या नोटिस जारी करण्यात आलेले आहे.इन्कम टॅक्स विभागाने आयकरत्यांना नोटिस पाठवून करमाफीसाठीचे कागदपत्रे मागविले आहे. सदरील नोटिसमध्ये घरभाडे पावत्या,अधिकृत कर्तव्ये पार पाडण्यासाठी मदतनिस्सांची नियुक्ती आणि गृहकर्जावरील व्याज यांच्याशी संबंधित बाबींचा सामावेश आहे. आयकर विभागाचे हे नोटिस मूल्यांकन वर्ष २०२२-२३ शी संबंधित आहे.

हे पण वाचा ~  Tax on EPF : आपल्या पीएफमधून पैसे काढल्यावर केव्हा किती टॅक्स लावला जातो ? पहा सविस्तर

Income tax notice

इन्कम टॅक्स ज्ञकायदा कर मूल्यांकन करणार्‍या अधिकाऱ्याला विशिष्ट कालावधीत केलेल्या व्यवहारांचे काही तपशील मागविण्याचा अधिकार आहे. पगारदार करदात्यांना आयटी कायद्याच्या कलम १०(१३ए) अंतर्गत घरभाड्यावर कर लाभ देखील मिळतो. वार्षिक १ लाख रुपयापर्यंतच्या भाड्यांसाठी घरमालकाचा पॅन उघडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे लोक नातेवाईकांच्या नावांची घरभाड्याच्या खोट्या पावत्यांचे बनवतात.

Income tax विभागाने सांगितले आहे की, नोकरीत असले तरी काही लोक स्वतःच्या घराचा वापर करून भाड्याची स्लिप बनवतात,परंतु संगणकाच्या तपासणीतून कोणत्याही व्यक्तीचा डेटा सुरक्षित राहिला नाही.अशा लोकांना इन्कम टॅक्स विभाग त्यांना नोटीस पाठवू शकते. थोडक्यात वापरकर्त्यांच्या बनावट भाड्याच्या पावल्यांमुळे समस्या उद्भवू शकते.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment