DA Allowance : आता या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाले ४% महागाई भत्ता वाढ गिफ्ट …

Da allowance : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की नुकताच महाराष्ट्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चार टक्के वाढ केलेली होती. नोव्हेंबर महिन्यात पगारात ४ टक्के वाढ सह फरक सुद्धा देण्यात येणार आहे.

जुलै ते नोव्हेंबर महिन्याचा फरकाचा समावेश होता. आता उर्वरित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा मागा भत्ता वाढीचे गिफ्ट देण्यात आलेले आहे, तर पाहूया

आता यांना ४ % महागाई भत्ता दरवाढ!

केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग, नवी दिल्ली यांच्या क्रमांक 42/04/2023-P& PW (D) दिंनाक २७.१०.२०२३ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  ST Employees : मोठी बातमी... "या" कर्मचाऱ्यांना दसरा दिवळीच्या तोंडावर मिळाले DA वाढीचे गिफ्ट.. पहा किती वाढणार पगार

केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०७.२०२३ पासून लागू करण्यात आलेली ४% महागाई भत्यातील (Dearness Pelief) दरवाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतनधारकांना/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही लागू राहतील.

Dearness allowance hike

त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतनधारकांना/ कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दि.०१.०७.२०२३ पासून ४६% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.

सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३११३०१५०६३९२५०७ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.

Leave a Comment