Close Visit Mhshetkari

Home loan संदर्भात RBI ची मोठी घोषणा! RBI गव्हर्नरने EMI बाबतीत दिली दिलासादायक माहिती

Home loan : भारतामधील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँकने द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे.रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

RBI Repo Rate updates

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की गृह कर्ज असेल वैयक्तिक कर्ज असेल किंवा इतर कोणतेही कर्ज असेल त्यावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट यावरती अवलंबून असतात.

बॅंक कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचे आरबीआयने जाहीर केले असून हा सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून रेपो रेट हा 6.50 % इतकाच असेल असं शक्तिकांत दास म्हणाले आहेत. त्यामुळेच व्यजदारांमध्ये कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.थोडक्यात home loan, vehicle loan, personal loan हप्त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.सध्याचा रेपो रेट हा 6.50 % इतका आहे.

हे पण वाचा ~  SIP vs Home Loan || आपली पगारवाढ झाली? SIP गुंतवणूक करावी की गृहकर्ज फेडावे? काय करणे योग्य? जाणून घ्या

रेपो रेट आणि बॅंक व्याजदर

मित्रांनो आपल्याला माहिती असेलच की,अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला Repo Rate म्हणतात. रेपो रेटच्या दरामध्ये झालेला बदल हा थेट कर्जदारांवर परिणाम करत असतो.जर RBI ने कमी व्याजदराने कर्ज दिल्यास बँका ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देते आणि RBI ने व्याजदर वाढवले की बँकाही आपल्या कर्जांचे दर वाढवत असते.

होम लोन नवीन व्याजदर येथे पहा

गृह कर्ज व्याजदर

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment