Close Visit Mhshetkari

7th Pay Arrears : सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जुलै च्या पगारात देण्याबाबत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित!

7th Pay Arrears : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना दि.०१ जूलै २०२३ रोजी देय असलेल्या सातवा वेतन आयोग थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणे बाबत शासन निर्णय दि.२०/०६/२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

7th Pay Commission Arrears

जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा, सर्व शासन अनुदानित संस्थिा मधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून २०२४ च्या वेतन/ निवृत्ती वेतनासोवत अदा करावे असे नमूद करण्यात आले होते.

माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून मान्यताप्राप्त १०० टक्के खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सन २०२४-२५ मध्ये ७ वा वेतन आयोग ०५ वा हप्ता अदा करणेसाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

हे पण वाचा ~  7th pay da hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर!लवकरच होणार ....

सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता

सद्यास्थितीत मंजूर अनुदानाच्या ४२ % अनुदान माहे जूलै अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्रक वित्त विभाग अर्थसं २०२४/प्र.क्र-३४/अर्थ- ०३/दि.०१/०४/२४ नुसार वितरीत करण्यात आले असून प्राप्त अनुदानातून माहे जुलै अखेरपयर्तचे नियमित वेतन अदा करणे क्रमप्राप्त असल्याने नियमित वेतन अदा करणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

घेणा-या कर्मचारी यांचे माहे जूले २०२४ चे वेतन सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला १.२.३.४ था हप्ता सह अदा करणे शक्य असल्याने, उपरोक्त लेखाशिर्षमध्ये वेतन घेण्या-या पात्र कर्मचारी यांचे माहे जूलै-२४ चे वेतन सातवा वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात येणार आहे. आता कोणत्याही परिस्थितीत नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी,अशी सूचना देण्यात आली आहे.

Leave a Comment