Close Visit Mhshetkari

Vehicle loan सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन खरेदी अग्रीन संदर्भात शासन निर्णय निर्गमित! आता मिळणार ‘एवढे’ रुपये अनुदान

Vehicle loan : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून आता राजपात्रित सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन खरेदी आगरी मंजूर करण्यासंदर्भात चा लाभ देण्यात येणार आहे यासंबंधी पाहूया सविस्तर माहिती

वाहन खरेदी अग्रिम मिळणार

वित्त विभाग, शासन निर्णय दि. १७.२.२०१२ अन्वये राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांना मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिम मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.

वित्त विभाग, शासन अधिसूचना दि. ३०.१.२०१९ अन्वये ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी दि. १.१.२०१६ पासून सुधारीत करण्यात आल्या आहेत.सुधारीत वेतन श्रेणीतील मुळ वेतन मोटार कार खरेदी अग्रिम खरेदी करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

नवीन किंवा जुनी मोटार कार खरेदीसाठी राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांना मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम – ५३६ आणि संदर्भाधीन अ.क्र. २ येथील वित्तीय अधिकार नियमपुस्तिका, १९७८, भाग पहिला, उप विभाग एक, अ. क्र. १२, नियम क्र. १३६ मधील अटी तसेच खाली नमूद केलेल्या अटींच्या अधीन सुधारित वेतन मर्यादेनुसार खालीलप्रमाणे अग्रिम अनुज्ञेय राहील.

वाहन खरेदी अग्रिम मंजुरीच्या अटी

  • सुधारीत वेतन बैंड नुसार ज्या राजपत्रित राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे ५ वर्षाच्या सेवेनंतरचे मूळ मासिक वेतन रु.५०,०००/- किंवा अधिक आहे अशा राजपत्रित राज्य शासकीय अधिकान्यांना या प्रयोजनार्थ अग्रिम अनुज्ञेय राहील. २. नवीन मोटार कार खरेदीसाठी अग्रिमाची रक्कम अधिकाऱ्याच्या वेतन बँड मधील मासिक वेतनाच्या १८ पट किंवा रु.१५,००,०००/- (रुपये पंधरा लक्ष फक्त) किंवा नवीन मोटार कारची प्रत्यक्ष किंमत यांपैकी जी रक्कम कमी असेल तेवढी अनुज्ञेय राहील.
  • जुनी मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिमाची रक्कम अधिकाऱ्याच्या वेतन बँड मधील मासिक वेतनाच्या ९ पट एवढी किंवा रु.७,५०,०००/- (रुपये सात लक्ष पन्नास हजार फक्त), किंवा जुन्या मोटार कारची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अग्रिम अनुज्ञेय राहील.
  • जुनी मोटार कार खरेदी करण्यासाठी अग्रिमाची रक्कम अधिकाऱ्याच्या वेतन बैंड मधील, मासिक वेतनाच्या ९ पट एवढी किंवा रु.७,५०,०००/- (रुपये सात लक्ष पन्नास हजार फक्त) किंवा जुन्या मोटार कारची प्रत्यक्ष किंमत यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अग्रिम अनुज्ञेय राहील.
हे पण वाचा ~  Vehicle agrim : मोठी बातमी... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार वाहन खरेदी अग्रीम! शासन निर्णय निर्गमित

Vehicle loan for employees

  • अग्रिमासाठी अर्ज करणाऱ्या अधिकाऱ्याची शासनाच्या सेवेतील नियुक्ती संबंधित पदाच्या सेवाभरती नियमानुसार करण्यात आलेली असली पाहिजे आणि अशाप्रकारे करण्यात आलेल्या नियुक्तीनंतर कमीत कमी ५ वर्षांची सलग सेवा झाली असली पाहिजे..
  • मोटार वाहन चालविण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून, कुटुंबातील एका व्यक्तिला मिळालेल्या कायम अनुज्ञप्तीची (Permanent Licence) छायाप्रत सादर करणे आवश्यक राहील.
  • अग्रिम मंजुरीपूर्वी अग्रिमासाठी अर्ज करणाऱ्या अधिकाऱ्याची सेवानिवृत्तीपूर्वी संपूर्ण अग्रिम रक्कम परतफेड करण्याची क्षमता असल्याची, अग्रिम मंजूर करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याची खात्री असावी.
  • अर्जदाराने आवश्यक बार्बीची पूर्तता केल्यानंतर सक्षम प्राधिकारी, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ अनुसार प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकाराप्रमाणे मोटार कार अग्रिम मंजूर करू शकतील.
  • मोटार कार अग्रिम मंजुरीच्या दिनांकापासून १ महिन्याच्या आत अग्रिम धारकाने मोटार कार खरेदी करावी, तसेच खरेदी केलेल्या मोटार कारच्या उत्पादनाचे वर्ष,खरेदीची तारीख व नोंदणीचे कागदपत्रे शासनास सादर करावीत. तसे न केल्यास अग्रिम धारकाकडून अग्रिमाची संपूर्ण रक्कम १ महिन्यानंतर दंडनीय व्याजासह एक रकमी वसूल करण्यात येईल.
  • मोटार कार अग्रिमाची व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यंत मोटार कार शासनाकडे गहाण राहील. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांस विहित नमुन्यात व कार्यपध्दतीप्रमाणे गहाणखत भरून देणे आवश्यक राहनार आहे.
  • गहाणखत भरून देण्यापूर्वी सदर मोटार कार यांत्रिकी दृष्टया निर्दोष आहे याची जबाबदारी अग्रिम घेण्या-या संबंधित अधिकाऱ्याची राहील.
  • मोटार कार अग्रिम वितरीत केल्याच्या पुढील महिन्यापासून अग्रिमाच्या वसुलीस सुरुवात करण्यात येईल.

वाहन खरेदी अग्रिम शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

वाहन खरेदी अग्रिम

Leave a Comment