Close Visit Mhshetkari

Mazi Ladki Bahin : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित !आता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया होणार…

Mazi Ladki Bahin : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

CM Mazi Ladki Bahin Yojana

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर,२०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास संदर्भाधीन दि.०२.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. 

शासन निर्णय दि.१२.०७.२०२४ व दि.२५.०७.२०२४ अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते.

हे पण वाचा ~  Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांनी 5 वर्षात व्हाल लखपती ! कसे ते समजून घेऊया...

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना 

आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे.सबब, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Comment