Close Visit Mhshetkari

EPF Pension : कर्मचाऱ्यांनाे लवकर ठरवा; वाढीव पेन्शनसाठी मुदत संपणार! फक्त या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील

EPFOEPF Pension : भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्ग अतिरिक्त भविष्य निर्वाह निधी मिळवण्याचा (पेन्शन) पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे.EPS मध्ये एकूण योगदानाच्या 8.33% अतिरिक्त रक्कम देण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाला आहे.नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सुधारित योजना 2014 साठी ग्राह्य ठरवलेली होती.

EPF Pension new updates

ईपीएफओ माध्यमातून पेन्शनधारक व कर्मचारी या सर्वांना अधिक पेन्शन मिळवायचे असेल तर अर्ज करायची प्रक्रिया सध्या सुरू आहे. EPFO कडून या अगोदरच सर्व पेन्शनधारकांसाठी पेन्शन मिळवाची मुदत पूर्वी तीन मार्च दिली होती.आता अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 03 मे 2023 अशी निश्चित करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष वेतनाच्या 8.33% रक्कम योगदान देण्याची परवानगी आहे.एक सप्टेंबर 2014 नंतर निवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना पेन्शन साठी संयुक्तरीत्या अर्ज करावे लागत आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भविष्य निर्वाह निधीसाठी अर्ज करण्याकरिता 3 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
पेन्शन कार्यालयामध्ये जाण्यापूर्वी काय काळजी घ्याल?

शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

कर्मचारी व पेन्शनधारकांना पेन्शनसाठी अर्ज कोणी भरावा?

कर्मचारी व पेन्शनधारकांना पेन्शनसाठी अर्ज करायचा असेल तर EPFO अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.या नव्या आदेशाप्रमाणे एक सप्टेंबर 2014 नंतर सेवानिवृत्त झालेल्या नीच हा पेन्शन चा अर्ज करावयाचा आहे.अशाच कर्मचारी व्यक्तींना पेन्शनचा लाभ मिळवून देण्यात येईल.

हे पण वाचा ~  PF Account : नोकरदारांनो, PF खात्यात अशी करा वारस नोंद,नाहीतर अडकू शकते तुमच्या कष्टाची कमाई; पहा सोपी पध्दत

वाढीव निवृत्ती वेतनाबाबत संभ्रम

कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेमधून वाढीव निवृत्तीवेतनाबाबत अद्यापही संभ्रम आहे.या संदर्भात कर्मचारी भविष्य निधी संघटनेने एक परिपत्रक जारी केले असून तीन मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले आहे.अर्जामध्ये दिलेली माहिती आणि EPFO कडील माहितीमध्ये तफावत आढळल्यास किंवा कंपनीने अर्ज फेटाळल्यास दुरुस्तीची संधी देण्यात येणार आहे

1) वाढीव पेन्शनसाठी संयुक्त अर्ज सादर केल्यानंतर पुढे काय होणार?
उत्तर – EPFO अर्जाची छाननी करणार असून कंपनीने सादर केलेला वेतन तपशील ईपीएफओ कडील तपशिलाशी जुळवून पाहिले जाणार आहे.

2) कंपनीने संयुक्त अर्जास मान्यता दिली नाही तर काय करावे?
उत्तर – जर कंपनीने संयुक्त अर्ज फेटाळल्यास कंपनीस अतिरिक्त पुरावे अथवा चुका (कर्मचारी अथवा निवृत्तांच्या चुकांसह) दुरुस्त करण्याची संधी दिली जाणार आहे.

3) EPFO संयुक्त अर्जात त्रुटी असल्यास काय करावे?
उत्तर – कंपनी व कर्मचारी यांनी सादर केलेला तपशील आणि EPFO कडील माहिती यात तफावत आढळल्यास अचूक तपशील सादर करण्यास सांगितले जाईल.

1 thought on “EPF Pension : कर्मचाऱ्यांनाे लवकर ठरवा; वाढीव पेन्शनसाठी मुदत संपणार! फक्त या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील”

Leave a Comment