UPS Calculator : जर कर्मचाऱ्याची सेवा 25 वर्षांपेक्षा कमी असेल… तर तुम्हाला UPS अंतर्गत किती आणि कशी मिळेल पेन्शन ? नियम जाणून घ्या

UPS Calculator : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारने नुकतेच यूपीएस म्हणजेच स्कीम योजना लागू केलेली आहे. ज्यामध्ये किमान सेवा 10 वर्ष होणे अनिवार्य आहे अशा कर्मचाऱ्यांना किमान 10 हजार रुपये पेन्शन दिले जाणार आहे.पंचवीस वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण म्हणजे मूळ पगाराच्या 50% निवृत्ती वेतन मिळणार आहे तर आज आपण याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

UPS Scheme Pension Calculator

सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन देण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या महिन्यात युनिफाइड पेन्शन योजना (यूपीएस) सुरू केली होती. नॅशनल पेन्शन सिस्टिम (NPS) ला पर्याय म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. 

आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक कोणत्याही योजनेचा पर्याय निवडावा लागणार आहे. एक एप्रिल 2025 पासून ही योजना अमलात येणार आहे.UPS मध्ये कर्मचाऱ्यांना 10 टक्के योगदान द्यावे लागते, तर सरकारचे योगदान 18.5 टक्के असेल. 

यूपीएसच्या घोषणेसोबतच केंद्र सरकारने सांगितले होते की, या योजनेअंतर्गत किमान 10 वर्षे काम करणाऱ्यांना किमान 10 हजार रुपये पेन्शन दिली जाईल. पूर्ण पेन्शन मिळवण्यासाठी किमान 25 वर्षांची सेवा द्यावी लागेल. पण जर कोणी या योजनेत 10 वर्षांपेक्षा जास्त आणि 25 वर्षांपेक्षा कमी काम करत असेल तर पेन्शनची गणना कशी केली जाईल ?  

हे पण वाचा ~  State Employees : मोठी बातमी ... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप संस्थगित ! कर्मचारी संघटना समन्वय समितीकडून प्रसिध्दी-पत्रक जारी ...

UPS अंतर्गत, पंचवीस वर्षे सेवा पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना त्याच्या पगाराच्या शेवटच्या वर्षाच्या सरासरीनुसार 50 % पेन्शन मिळणार आहे.साहजिकच सदरील मिळणारे पेन्शन ही शेवटच्या पगाराच्या पेन्शन पेक्षा कमीच असणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे, त्यांच्या पेन्शनची रक्कम त्यांच्या कार्यकाळानुसार आनुपातिकपणे मोजली जाईल. याशिवाय महागाई भत्ता सुद्धा या पेन्शनमध्ये जोडला जाणार आहे.

युनिफाइड पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये 

  1. पेन्शनची रक्कम ही मागील 12 महिन्यांत प्राप्त झालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% असणार आहे.
  2. किमान पात्रता सेवा विचारात घेतली तर किमान 25 वर्षे सेवा अनिवार्य आहे. 
  3. किमान 10 वर्षांच्या सेवेसह 25 वर्षांपेक्षा कमी सेवा कालावधीसाठी पेन्शनची रक्कम गणाली जाते. 
  4. कौटुंबिक पेन्शन दिले जाईल. कर्मचाऱ्याच्या मृत्यूपूर्वी लगेचच 60% पेन्शन दिली जाते. 
  5. किमान 10 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्तीनंतर दरमहा 10 हजार रुपये दिले जातील. 
  6. निवृत्ती वेतन, कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि किमान निवृत्ती वेतनावर महागाई सवलत दिली जाईल. 
  7. ग्रॅच्युइटी व्यतिरिक्त सेवानिवृत्तीवर एकरकमी रक्कम दिली जाईल.

Leave a Comment