Student Scholarship : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणा व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद निर्मित शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका संच जिल्हा- परिषद सेस फंड / मनपा निधीतून उपलब्ध करुन देणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा 2024
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या पत्रान्वये केलेल्या आव्हानास आपण विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन सकारात्मक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2024 साठी परीक्षा परिषदेच्या
https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर दि. 01/07/2023 रोजी पासून शाळांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार होती.
शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे सदर सुविधा दि.01/07/2023 ऐवजी दि. 01/09/2023 रोजी पासून सुरु करण्यात येणार आहे.तरी आपल्या जिल्ह्यात इ. 5 वी व इ. 8 वी मध्ये शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला प्रविष्ठ होण्यास प्रोत्साहित करण्याबाबतच्या उपाययोजना आपल्या स्तरावरुन करण्यात याव्यात अशी विनंती सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षण यंत्रणेला करण्यात आली आहे.
Scholarship exam online apply
शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती रकमेत इ. 5 वीच्या सर्व संचांकरीता रु.500/- प्रतिमाह प्रमाणे (रु.5000/- प्रतिवर्ष) व इ. 8 वीच्या सर्व संचांकरीता रु.750/- प्रतिमाह प्रमाणे (रु.7500/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे. त्याचा फायदाही विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात निश्चितच होईल.
प्रत्येक जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्ता विकासाकरीता जिल्हा परिषद सेस फंड, मनपा / इतर निधीतून परीक्षा परिषद निर्मित मार्गदर्शिका संच उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.
यासाठी सर्व प्रविष्ठ विद्यार्थ्याचे शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंड / मनपा निधीतून अदा केल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला बसण्याची संधी मिळेल.
शिष्यवृत्ती परीक्षा 2024 शासन परिपत्रक येथे पहा – शिष्यवृत्ती परीक्षा